kharif pik e panchnama : अतिवृष्टीमुळे घराची पडझड व खरीप पिकाच्या ई पंचनाम्याचे आदेश

Kharif pik e panchnama गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात झालेल्या संतत अतिवृष्टीमुळे नगरातील व मुल तालुक्यातील घराची पडझड झालेल्या ९४० क्षतिग्रस्तांना शासनाच्या तात्काळ अर्थसहाय्य योजनेंतर्गत त्यांच्या वयक्तिक बँक खात्यात ४७ लाखाचे अर्थसहाय्य २६ जुलै २०२४ रोजी जमा करण्यासाठी पाठविण्यात असल्याचे मुलच्या तहसीलदार मृदुला मोरे मॅडम यांनी सांगितले. तसेच मुल तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले होते. पीडित शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळण्यासाठी ई पंचनामा करण्याचे निर्देश मूलचे तहसीलदार मृदुला मोरे मॅडम यांनी दिले आहेत.

तो नरभक्षक वाघ अडकला वनविभागाच्या जाळ्यात


Kharif pik e panchnama तालुक्यातील विविध भागांत मागील २१ ते २६ जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. अतीवृष्टीने तालुक्यातील विविध गांवातील नदी,नाले व ओढ्यांसह शेतशीवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले होते. तर काही भागात नाल्याला आलेले पुराचे पाणी शेतशिवरातील लागवड केलेल्या धान, कापूस, तूर खरीप पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने हजारो हेक्टर खरीप धान पिके पाण्याखाली बुडाली होती. त्याचे ४-५ दिवसांपासून शेतात पिके पाण्यात बुडाल्याने पंचनामे करून शासनाकडून नूकसानभरपाईची मागणी सर्वस्तरातून जोर धरली होती.


गेल्या सहा दिवसांहून अधिक अवधीपर्यंत चौरस भागातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके पाण्याखाली बुडालेली आहेत. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणाची मागणी होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे अपरिमीत नुकसान झाले असून यंदा धानाची फसल हातची जाणारच अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मूल तालुक्यात सर्वाधिक ७६८ मिमी पावसाची नोंद झाली, तर पडलेला पाऊस (मिमी,२६ जुलैपर्यंत)
मूल तालुक्यातील चौरास भागात मोठ्या प्रमाणात कृषी वीज पंप सिंचन सुविधेअंतर्गत विविध पिकांची लागवड केली जाते, परंतु पूर्ण पिके पुराच्या पाण्याने बुडाले. शेतकऱ्यांचे अवजारे, पाईप,खते,साहित्य पूर्ण वाहून गेले.

मूल तालुक्यातील दाबगाव येथील मामा तलाव फुटल्याने ८० एकर शेतात रेती पसरली. शेतात २० फुटांचे खड्डे पडले. ५० शेतकऱ्यांना नुकसानीची झळ बसली. इंग्रज काळातील या तलाव परिसरात ८० एकर शेती येते. काहींनी रोवणी केली, तर काही तयारीत आहेत. तलावाची पाळ फुटल्याने मोठे नुकसान झाले.तलावात काहीच पणीच शिल्लक नाही. शेतात खड्डे व रेतीचा ढीग जमा झाला. शासनाने पंचनामे करून भरण्याची देण्याची मागणी दाबगावचे शेतकरी महादेव थेरकर यांनी केली. मूल तालुक्यात एक हजार ७५८ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले. अतृिष्टीने ३३२ घरे व ३५ गोठ्यांची पडझड झाली. १ हजार ४१५ घरांत पाणी घुसल्याने नुकसान झाले. १ हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. यामध्ये २ हजार ८९३ शेतकरी पात्र असून पूर्ण पंचनामे करण्याचे काम सुरूच असल्याचीही माहिती तहसीलदार मृदुला मोरे यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!