Education system in maharashtra : शिक्षणाच्या बाजारीकरण विरोधात राष्ट्रवादी कांग्रेसचे चंद्रपुरात आंदोलन

Education system in maharashtra राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाच्या वतीने चंद्रपुरातील गांधी चौकात 2 जुलै ला खासगी शाळेच्या बाजारीकरण विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

महत्त्वाचे : लाडक्या बहिणीला अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

खासगी शाळा व्यवस्थापकांनी ठरवून दिलेल्या दुकानातून शाळेचे कपडे, पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली आहे, आज केजी 1 ते वर्ग पहिली चे पुस्तके अडीच ते 3 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे, ही पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गट राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे, महिलांचा छळ करणारी योजना होय – डॉ.अभिलाषा गावतुरे

Education system in maharashtra ते पुढे म्हणाले की महागडी पुस्तके घेतल्यावर त्याची पुढे किंमत काय? आपण ती पुस्तके रद्दीत विकली तरी त्याचे कमी पैसे मिळतात म्हणून खासगी शाळेचे नियम हे मनपा शाळेप्रमाणे असायला पाहिजे.
आंदोलनात शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा कांबळे आदि उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!