Farmers in trouble गुरू गुरनुले
मुल – यावर्षीच्या २०२४ च्या चालू खरीप हंगामाची पूर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली असून मागील पंधरा दिवसांपूर्वीच पावसाळा सुरू होताच रोवण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले तर सर्वसाधारण व गरीब असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला खर्च जास्त येते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी धान आवत्या टाकले आहेत. परंतु हंगाम सुरु झाल्यापासून तर आजपर्यंत मुल सावली, पोभूर्णा तालुक्यात फक्त थोड्या प्रमाणात पाऊस थिरकला परंतु धान पिकाला लागणारा पाऊस अजूनही पडला नाही.
अवश्य वाचा : शिवसेनेच्या कार्यक्रमात महिलांचा जनसागर
आजच्या स्थितीत, खाजगी गाव तलाव, मामा तलाव, नदी, छोटे नाले, बोड्या, पूर्णतः कोरडे पडले आहे. तरी देखील पाऊसाचा पत्ताच नाही. त्यामुळे अती तीक्ष्ण व गर्मीच्या उकाड्यामुळे पेरणी केलेले धानाचे पऱ्हे, आवत्या सुकायला लागले असून पिवळसर पडत आहेत. याकरिता शेतकरी चिंतेत सापडला आहे.
महत्त्वाचे : पीकविमा नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ द्या – सुधीर मुनगंटीवार
जर येत्या चार पाच दिवसात पेरणीला पाणी दिले नाही तर मात्र हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही. अशी वेळ शेतकरी बांधवांवर आलेली आहे. तसेच पऱ्हे रोवणी करीता आले असताना पाण्या अभावी अडून बसले आहेत. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पिकाची आशा सोडली असल्याचे बोळून दाखविले आहे. त्यामुळे सावली – मुल दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर तात्काळ आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी सावली तालुक्यातील सावली, खेडिसह पूर्ण गावे व मुल तालुक्यातील राजगड, फिस्कुटी, वीरई, चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भूजला), बेंबाळ, नांदगाव, बोंडाळा,चक दुगाळा , येरगाव, चक् बेंबाळ, बोरचांदली, चीचाला, येरगाव, इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी कांग्रेस नेते सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष व माजी.जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे कडे केली आहे.
सावली तालुका पूर्ण, तर मुल तालुक्यातील काही गावे निस्तार हक्का प्रमाणे आसोला मेंढा तलाव प्रकल्प याचे लाभधारक आहेत. तलावातील पाणी सोडण्याची जबाबदारी आसोला मेंढा तलाव नूतनीकरण उपविभाग क्र.६ उपअभियंता) यांचेकडे आहे. मुल – तलाठी साजा क्रमांक १२ मंडळ खेडी मध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, खेडी ते गोंडपीपरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टेल पर्यंत शेतीला पाणी पुरवठा व्हायला खूप वेळ लागतो.करीता त्वरित तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने संतोषसिंह रावत यांचेकडे केली. जर का येत्या दोन दिवसात तलावाचे पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा देखील रावत यांनी दिला आहे.
खेडी साजातील मुख्य हायवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आसोला मेंढा प्रकल्प नूतनीकरण उपविभाग क्रमांक ६ उपअभियंता सावली यांनी पाईप लाईन टाकण्याचे व शेतात वाल लावण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अधिकाऱ्यांनी तेही पूर्ण केले नाही. त्यामुळे या हंगामात अनेक शेतकऱ्यांना धान पीक घेता येणार नाही असे चिन्ह दिसून येत आहेत. करीता याही शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे पाणी कसे देता येईल याचाही विचार करावा असे संतोषसिंह रावत यांनी म्हंटले आहे.