fatal journey : खासदार मॅडम लक्ष द्या

Fatal journey वरोरा – मागील 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोर पकडला असून नदी नाले उसांडून वाहत आहे, ग्रामीण भागात नागरिकांची दयनीय अवस्था या पावसामुळे झाली अशी बाब पुढे आली आहे, ही दयनीय अवस्था खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गृह तालुक्यातील आहे.

अवश्य वाचा : दोन विभागामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Fatal journey पुरातून जीवघेणा प्रवास करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हिडिओ पुढे आला आहे. एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि दुसऱ्या हाताची साखळी करून विद्यार्थी पुरातून मार्ग काढीत आहे. हे विध्यार्थी वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावातील आहेत. शिक्षणासाठी त्यांना वरोऱ्याला जावं लागतं. जिल्हातील कोसरसार ते बोडखा मार्गावरील नदीवर जुना पूल आहे.या पुलावरूनच मागील पंचवीस वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ ये जा करतात.मात्र पुल लहान असल्याने मोठा पाऊस आला की काही तासातच पुलावरून पाणी वाहू लागतंय.

व्हिडीओ

अवश्य वाचा : घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे – सुधीर मुनगंटीवार

बोडखा मोकाशी गावाला ये जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने भर पुरातुन त्यांना मार्ग काढीत जावे लागते. येथील विद्यार्थी कोसरसार व वरोरा येथील शाळेत शिक्षण घेतात.पावसाळ्यात विध्यार्थ्यांना पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.या नदीवर नव्या पुलाची निर्माती करावी अशी मागणी वारंवार गावकर्यांना प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या जवळ केली मात्र त्यांचा मागणीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही.चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो घरांची पडझड तर हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!