Flood situation गुरू गुरनुले मुल – गेल्या तींन दिवसापासून दिवस रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, मुल साभोवतालची मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीला पूर आला आहे. मागील २४ तासांत मूल तालुक्यात सर्वाधिक मुल परिसरात मागील एक दिवसात 247 mm पाऊस झालेला आहे, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल मूल तालुक्यात मुल परिसरात मागील एक दिवसात 247 mm पाऊस झालेला आहे, मिलिमीटर पाऊस पडला. उमा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीच्या पुरामुळे मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गाडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद झालेला आहे मुलच्या भोवतालची सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा मूल तालुका. प्रशासनाने, पोलिस प्रशासनाने दिला आहे.
मामा तलाव फुटला, चीचपल्ली गावात हाहाकार
Flood situation सर्व जनतेला सूचना आहे की मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गाडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद झालेला आहे तरी सदर मार्गावरील प्रवास करणारे नागरिकांनी प्रवास करू नये.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे पोलीस स्टेशन मुल हद्दीतील
1) मूल ते चंद्रपूर जाणारे मार्गावरील आगळी जवळील तलाव भरल्याने रोडवर पाणी आल्यामुळे मार्ग बंद आहे, त्यानंतर अंधारी नदी वरून पाणी वाहत असल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद आहे.
2) जाणाळा ते सुशी जाणारा मार्गा वरील चीरोली जवळील अंधारे नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे.
3) मरोडा ते भादुर्णा ला जाणारे रोडवरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे
4) मुल ते करवण काटवण जाणारे रोडवरील रेल्वे बोगदया मध्ये पाणी भरल्याने मार्ग बंद आहे
5) मूल ते सावली जाणारे रोडवरील आक्कापर गावाजवळी ल नाल्यावर उमा नदीचे पुरा मुळे तीन ते चार फूट पाणी वाढल्यामुळे मार्ग बंद आहे.
6) मौजा मूल येथील रामपूर वार्डात घरात पुराचे पाणी घुसले आहेत.
7) रजोली ते पेडगाव जाणारे रोड वरील गावाजवळ नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे पेटगाव जाणारा मार्ग बंद झाले आहे.
8) मुल ते राजोली ब्रह्मपुरी जाणारे रोडवरील उमा नदीचे समोरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झालं आहे.
तरी पूर परिस्थिती वर लक्ष ठेवले असून योग्य बंदोबस्त लावण्यात आले आहेत. मुल शहरात सर्वत्र पाणीच पाणी झोपडपट्टीत घरात घुसले पाणी संपूर्ण नगर जलमय झाला आहे.