Flooding in rural areas गुरू गुरनुले मूल – गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुल व चिमढा नदीला महापूर आल्याने दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील धान पीक व कापूस पीक बुडाले. यामधे शेतकऱ्यांचे फार मोठे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सतत चार दिवसापासून शेतात पाणी तुडुंब भरल्याने धान पीक आवत्या पेरणी व पऱ्हे पूर्ण वाया गेले आहे. दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. उमा नदी आणि नाले दुथडी भरुन वाहू लागले आहे. नदीचे आणि पावसाचे पाण्यामुळे तालुक्यातील धान शेती पाण्याखाली आली. उमा नदीच्या काठावरील धान उत्पादक शेतक-यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
अवश्य वाचा : एक वाढदिवस बनला वृक्षारोपणाची मोहीम
Flooding in rural areas शेत बांध्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. उमा नदी आणि अंधारी नदीच्या पुलावरुन पाणी असल्याने मूल वरून जाणारे मार्ग बंद झाले आहे. चंद्रपूर, सावली, गडचिरोली या मुख्य मार्गासह ग्रामिण भागातील मार्ग बंद झाले आहे. सर्वत्र आलेल्या पुरसदृश्य परिस्थिती मुळे तालुक्यात चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. उमा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने संततधार पावसामुळे धान उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ज्या ठिकाणी रोवणी झाली त्याठिकाणचे धान रोपे वाहून गेले, धान आवत्या पीक खराब झाले वाहून गेले असल्याचे प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांनी सांगितले. अशा प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या कृषी विभागाने,महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यासमक्ष सर्व्हे करणाऱ्यांनी पाहणी करावी,पंचनामा करावा, नुकसानग्रस्तांना विश्वासात घ्यावे व पीक परिस्थितीचा अचूक अहवाल शासनाकडे त्वरित सादर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच दुबार पेरणीसाठी व संपूर्ण येणाऱ्या खर्चासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषशिन्ह रावत यांनी केली आहे.
मुल तालुक्यातील भादूर्णी, उसराला, रत्नापुर, राजोली, चिखली,डोंगरगाव, मऱ्हेगाव, टेकाडी, आकापुर, मोरवाही, मुल अंतर्गाव पारडवांही, ताडाळा, चीचळा,हळदी, भेजगाव, नागाळा,चीचपल्ली, बोरचांदली, वीरई, फिस्कूटी,येरगाव, नवेगाव (भूज) चुरुड तुकूम आणि सभोवतालचे अनेक गावे वैनगंगा नदीच्या पुराने बाधित झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील अनेक गावातील शेती पाण्याखाली आली आहे. तसेच सावली तालुक्यातील सावली अनेक गावे, कुक्कुड चीमढा, खेडीतील शेकडो हेक्टर शेती अजूनही पाण्यात बुडून आहे. धान पीक पेरणी पूर्ण वाया गेली आहे.
चिखली शिवारातील शेतातील पाईप,शेतीअवजारे,पुराने वाहून गेले आहे. येरगाव येथील शेतकरी संजय फुलझेले यांचे शेतातील मोटार पंप,पाईप,नांगर, वखर,शेती अवजारे वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. बोरचांदली येथील तीन शेतकर्यांच्या शेतातील शेकडो खताच्या बॅग पाण्याने खराब झाल्या. अजूनही पूर परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. ब्रम्हपुरी,गडचिरोली,चामोर्शी वाहतूक सुरु झालेली नाही. आजही किरकोळ स्वरूपाचा पाऊस पहाटे पासून सारखा सुरूच आहे. एकंदरीत मुल,सावली तालुका पूर्ण दुष्काळात सापडला असून दोन्ही तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर करावे.
दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे,खते तात्काळ उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष शिन्ह रावत यांनी केली आहे. पीक विण्याचे पैसे त्वरित मंजूर करावे. यावर्षी चालू हंगामात शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी मंत्रालय यांचेकडून हंगाम सुरु होताच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढला आहे. आणि लगेच पेरणी व रोवणी, आवत्या परल्याने संपूर्ण पीक पुरात वाहून गेले आहे.शेतकरी हवालदिल,कर्जबाजारी झाला आहे. करीता शासनाने संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याचे पैसे त्वरित मंजूर करावे,प्रसंगी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी संतोष सिंह रावत यांनी केली आहे.