Gadchandur Bomb Case : असा फसला त्या जुळ्या भावांचा प्लॅन

Gadchandur bomb case प्रतिनिधी | प्रकाश हांडे
गडचांदूर – गडचांदूर शहरात 30 जुलैला भगवती nx या कापड दुकानात अज्ञात इसमाने बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याने खळबळ उडाली होती.
बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याने आरोपी इसमाने भगवती nx वस्त्र भांडार चे मालक शिरीष बोगावार व त्यांच्या पत्नीला फोन केला, आणि तुमच्या दुकानात आम्ही बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले.

अवश्य वाचा : पायलट बनण्याचे स्वप्न होणार पूर्ण, असा करा अर्ज


Gadchandur bomb case गडचांदूर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी 2 जुळे भाऊ आयुष धाबेकर व पियुष धाबेकर यांना अटक केली. आरोपीनी धमकी देत खंडणी वसुली करण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
आरोपी जुळे भाऊ हे दोघे चिमूर तालुक्यातील निवासी असून दोघेही गडचांदूर येथे जलजीवन मिशन च्या कामाकरिता आले होते, अंगावर कर्ज झाल्याने ते फेडायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता, त्यामुळे त्यांनी ही योजना आखली. दोघा भावांनी youtube बघून पाईप, सर्किट, led लाईट व घडी च्या साहायाने तो बॉम्ब बनविला होता. सदर बॉम्ब बनावट असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोध पथकाने तो बॉम्ब निकामी केला.
तब्बल 7 तास हे बनावट बॉम्ब नाट्याने पोलीस विभागाची तारांबळ उडाली होती, या प्रकरणात अजून 1 आरोपी असून सध्या तो पसार आहे. गडचांदूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

विशेष बाब म्हणजे 2024 या वर्षात चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीने चर्चेत आला आहे, एक लहानश्या जिल्ह्यात अश्या प्रकारे गुन्हे घडणे ही एक गंभीर बाब आहे, जुलै महिन्यात 3 गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे, जिल्ह्यात बंदुकीचा पुरवठा कुठून होत आहे, याबाबत मात्र अजूनही काही सुगावा लागलेला नाही. नव्या पोलीस अधिक्षकांसमोर गुन्हेगारीने नवे आवाहन उभे केले आहे. पोलीस प्रशासनाला आता आपली गुप्त यंत्रणा मजबूत करायला हवी.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!