Gadchandur Bomb : गडचांदूर येथील Youtube बॉम्ब अखेर निकामी, सख्ख्या भावांना अटक

Gadchandur Bomb चंद्रपूर/गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात गोळीबाराच्या तीन घटनांनी जिल्हा हादरून गेला होता, मात्र महिन्याच्या शेवट चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका येथील गडचांदूर शहरात 30 जुलैला दुपारी भगवती वस्त्र भांडार येथे समोरील भागात एका अनोळखी इसमाने कापडाची पिशवी ठेवली, आणि निघून गेला, काही वेळाने सदर पिशवी कुणाची याबाबत विचारपूस करण्यात आली, पिशवी संशयास्पद आल्याने भगवती वस्त्र भांडार चे चालक शिरीष बोगावर यांनी गडचांदूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

अवश्य वाचा : गृहमंत्री साहेब चंद्रपुरात गुन्हेगारी वाढतेय, प्रतिभा धानोरकर यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा


Gadchandur Bomb पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, पोलिसांना त्या पिशवीत बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निष्पन्न होताच, ती पिशवी सावधानता बाळगून दुकानाच्या बाहेर काढण्यात आली.
याबाबत वरिष्ठ पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली, चंद्रपूर पोलिसांचे बॉम्ब शोध पथक दाखल झाले.यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व इतर वरीष्ठ अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले होते.


बॉम्ब शोध पथकाला सदर पिशवीत बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निष्पन्न होताच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील बॉम्ब नाशक पथकाला पाचारण केले.
गडचिरोली च्या पथकाने त्या ठिकाणी बंकर तयार करीत बॉम्ब सदृश्य वस्तूची तपासणी केली, डिफ्युज करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र पोलिसांना यश मिळाले नाही.
त्या क्षणी पावसाने जोरदार एंट्री मारली, अखेर पोलिसांनी त्या बॉम्ब सदृश्य वस्तूला सुखरूप उचलत ट्रॅक्टर मध्ये टाकले, यावेळी गडचांदूर शहराची संपूर्ण वीज व बाजार बंद करण्यात आली होती, सदर बॉम्ब हा गडचांदूर शहरातील शारीरिक महाविद्यालयात नेण्यात आले. अखेर अर्धा तासानंतर बॉम्ब नाशक पथकाने त्या बॉम्ब ला निकामी केले, गडचांदूर पोलिसांनी या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे, त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, दोन्ही युवकांवर कर्ज झाले असल्याने त्यांनी बोगावर यांच्याकडून खंडणी मागण्यासाठी हा प्रकार केला अशी माहिती आरोपीनी दिली. दोन्ही आरोपी हे सख्खे जुळे भाऊ (आयुष-पियुष) आहे, या प्रकरणात अजून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

अवश्य वाचा : महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळणार मोफत

आज मंगळवार असल्याने गडचांदूर शहरात बाजाराचा दिवस होता, भगवती एनएक्स वस्त्र भांडार हे ठिकाण अतिशय गजबजलेले असते, भर दिवसा एकाने त्याठिकाणी सदर प्रकार घडवून आणला, यामुळे सदर परिसर हादरून गेले.


आरोपी असे लागले पोलिसांच्या हाती

बॉम्ब ची पिशवी ठेवल्यावर आरोपी युवकांनी भगवती वस्त्र भांडार चे मालक शिरीष बोगावर यांना व त्यांच्या पत्नीला कॉल केला व तुमच्या दुकानात बॉम्ब ठेवला आहे, असे सांगून त्यांनी कॉल कट केला, आरोपी तरुणांना असं वाटलं की बोगावर हे परत कॉल करतील मात्र तसे न होता बोगावार यांनी थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली.
आरोपीना बोगावार यांना धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची होती अशी माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणातील

पोलीस म्हणतात तो बॉम्ब बनावट


आरोपीनी youtube च्या माध्यमातून सदर बॉम्ब बनविला होता, जर तो बॉम्ब बनावट होता तर पोलिसांना इतका वेळ त्याला खरा की खोटा समजायला वेळ का लागला?
सदर बॉम्ब बनावट असल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!