gas cylinder yojana : महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

gas cylinder yojana माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाचे :पायलट बनायचंय? आता हे स्वप्न होणार पूर्ण

Gas cylinder yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला १५०० रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून त्याचा शासकीय आदेश काढला जाणार असून अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

अवश्य वाचा : शिवसेनेचा रोजगार मेळावा, 50 कंपन्या देणार तुमच्या हाताला काम

तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार?
उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे 300 रुपये अनुदान देते, एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरुन प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, व आता लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कटुंबात एका रेशनकार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलिंडर दिला जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

🙏🏻 कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!