hansraj ahir महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसीवर दि. 26 जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली.
अवश्य वाचा : चंद्रपूरात 2 युवकांचा जीवघेणा स्टंट
Hansraj ahir मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह 16 जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होणार
या जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व 18 जातींचा समावेश केंद्रीय सुचीमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.