Heavy rainfall गुरू गुरनुले मुल – दोन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे मुल तालूक्यातील गरिबांच्या घरांची पडझड झाली असून गुरांचा गोठाही पडल्याने नागरिकांचे अंशतः काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील मौजा चीरोली मंडळ साजा येथील ३ घरे, कांतापेठ साजा ४ घरे, नलेश्र्वर साजा २ घरे, सुशी दाबगाव साजातील ४ घरांची पडझड झाली असून केलझर येथील १ गुरांचा गोठा, तसेच बोरचांदली २, टेकडी १, जुनसुरला १, चांडापुर १, गडीसूर्ला २, भवराला गोठा १ असे पडल्याने जनावरांनाही पाण्याची झळ सोसावी लागत आहे.
अवश्य वाचा : पूर बघण्यासाठी गेले आणि पुरात वाहून गेले, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Heavy rainfall तसेच नलेश्र्वर येथील एका शेतकऱ्याची ०.३० आर शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल अधिकारी तहसीलदार मृदुला मोरे मॅडम, नायब तहसीलदार यशवंत पवार, मंडळ अधिकारी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून याबाबतची माहिती शासनाला पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. अती पाऊस झाल्याने तालुक्यातील उमा नदी, चीमढा नदी, सर्व नाले,तलाव, बोडया भरल्या आहेत.
महत्त्वाचे : विशालगड हिंसाचार, कारवाई करा, चंद्रपुरातून मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन
मुल व सावली तालुक्यातील अनेक शेतात पाणी साचल्याने धान आवत्या पऱ्हे डूबून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान पेरणी बुडाली आहे. कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. काही प्रमाणात धान पिके बुडाली असल्याने चांगलीच नुकसान झाली आहे.तालुक्यातील महसूल अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.