Human Wildlife Conflict गुरू गुरनुले मुल – मानव व जंगलातील वन्यजीव या दोघांचे संघर्ष सध्यस्थितीत होत असल्याचे दिसून येत आहे. मानवाला वन्य प्राण्यांविषयी जिव्हाळा कमी होत चालला आहे. तसेच वन्यप्राणी देखील गावाकडे यायला लागले आहेत.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात वाढतेय गुन्हेगारी, प्रतिभा धानोरकर यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट
Human wildlife conflict त्यामुळे मानव व वन्य प्राणी यातील संघर्ष वाढू नये वन्य प्राण्यांना वनामद्ये स्वातंत्र्याने जगता यावे, तसेच मानव देखील सुरक्षेत राहावे या उदात्त हेतूने चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर अंतर्गत वनपरिक्षेत्र चिचपल्ली (प्रादेशिक) मधील जानाळा, कान्तापेठ येथे मानव वन्यजीव संघर्ष बाबत घडत असल्याने दिनांक ३० जुलै २०२४ रोजी चंद्रपुर वन विभागाचे प्रशांत खाड़े विभागीय वन अधिकारी, व चिचपल्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात जाणाला, कान्तापेठ, चीचाळl, कवळपेठ या गावात मानव वन्यजीव संघर्ष बाबत महत्त्वपूर्ण सभा आयोजित करुन जनजागृती करण्यात आली.
महत्त्वाचे : लाडक्या बहिणीला मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत
याप्रसंगी श्री. अजिंक्य भांबुरकर संचालक, वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन नागपूर यांनी मानव वन्यजीव संघर्ष टाळन्याचे दृस्टीने दोन्ही गावातील नागरिकांना योग्य व सविस्तर मार्गदर्शन केले. सदर सभेस जानाळा वनरक्षक राकेश गुरनुले, सविता गेड़ाम वनरक्षक चिरोली व परिसरातील गांवकरी उपस्थित राहून मानव व वन्यजीव संघर्ष बाबत अमूल्य असे मार्गदर्शनाचा लाभ घेतला.