Irai dam chandrapur चंद्रपूर जिल्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने बळीराजा चिंतीत झाला होता, मात्र जुलै महिन्याच्या मध्यभागात पावसाने जोरदार मुसंडी मारली. मागील आठवड्यात शहरात आलेल्या पावसाने मनपाची पोल खोल केली, नाल्या जाम झाल्याने नाल्याचे पाणी शहरातील विविध भागात तब्बल 1 ते 2 फूट जमा झाले होते.
18 जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून सध्या जिल्ह्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे.
अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे इरई धरण धोक्याची पातळी गाठत असल्याने प्रशासन 20 जुलै ला दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार असल्याने नदीजवळ राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील या गावाचा पाणीपुरवठा ठप्प
Irai dam chandrapur इरई नदी भरून वाहत असल्याने नदी लगतच्या भागात पाणी शिरू शकते तरी आवश्यकता भासल्यास नागरिकांनी जवळच्या मनपा शाळेत आश्रय घ्यावा.
आपत्ती प्रसंगी खालीलक्रमांकावर संपर्क करावा फायर ऑफिस लैंडलाइन नंबर
101, (07172-259406), 9823107101, 8975994277, 07172-254614 असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 3 तासात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह अतिमूसळधार पावसाचा इशारा दिला आहे, करीता नागरिकांनी सतर्क रहावे, आवश्यक काम असल्यास घराबाहेर पळावे.
धरणाचे दरवाजे उघडल्यावर धोका कुणाला?
इराई धरणाने 205.750 मी पातळी गाठलेली असून 20 जुलैला दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार आहे. त्यामुळे पद्मापुर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंत नगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिंचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुरला, विचोडा बुजुर्ग, अंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराला, हिंगनाळा, चिंचोळी, मिणगाव, वडगाव, चंद्रपूर आणि माणा आणि नदीजवळ असलेल्या गावांना धोका आहे. नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर रहावे, तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता, नदी पात्रापासून दूर ठेवावी, अन्यथा होणाऱ्या कोणत्याही जीवित किंवा वित्त हाणीला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही.