Irrigation system मुल – मुल तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारली आणीं शेतकरी हतबल झाला आहे,मुल तालुक्यातील काही गावे जसे फिस्कुटी विरई,चीचाळा,हळदी ताडाळा, दहेगाव, भेजगावं हे गावे सिंचनाच्या भरवष्यावर आपले धान्य जगवितात,आणि आपली उपजीविका भागवतात,परंतु सुरुवातीला पाऊस आला आणि मग अचानक मुल तालुक्यात पावसाने दडी मारली,शेतकरी हवालदिल झाला.
तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पुढे काय अशी चिंता सतावू लागली इतक्यात शेतकऱ्याना आपल्या हक्काचा माणूस संदीप गीऱ्हे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांना भ्रमणध्वनी द्वारे फिस्कुटि येथील माजी सरपंच अनिल लेनगुरे यांनी संपर्क केला.
अवश्य वाचा : शिवसेनेच्या कार्यक्रमात महिलांचा जनसागर
Irrigation system शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी 13 जुलै रोजी थेट फिस्कूटी गाव गाठून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची परिस्थिती समजून घेत सिंचन विभागाचे अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे त्वरित संपर्क केला आणि त्यांना अल्टिमेटम दिला की शेतकऱ्यांना गोसीखुर्द प्रकल्पाचं पाणी सोडले नाही तर शिवसेना स्टाईल नी आंदोलन करण्यात येईल,आणि याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील अस ठणकावून सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या इशाऱ्यानंतर आज दिनांक 15 जुलै रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे यांनी शेतकऱ्यांसोबत आपला ताफा सोबत घेत सिंचन विभाग सावली येथे वळविला, इतक्यात सिंचन विभाग कार्यालयातून संपर्क केला की आपली मागणी रास्त आहे आणि शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लागला असून 18/7/2024 ते 25/4/2024 दरम्यान शेतकऱ्याना सिंचनाची सुविधा देण्यात येईल,प्रत्येक शेतकरयांना पाणी पुरवठा करण्यात येईल अस माहिती मिळाली.
महत्त्वाचे : 10 दिवसात आर्टिफिशियल ज्वेलरी चे चंद्रपुरात मोफत प्रशिक्षण
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांचे फिसकुटी, विरई,चिचाळा, तडाऴ,हळदी,गावातील जनतेनी मनापासून आभार मानले.
80 टक्के समाज कारण 20 टक्के राजकरण हेच शिवसेनेचे ध्येय धोरन या तत्वावर मि काम करत राहील अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ यानी व्यक्त दिली.