jangli sambar (गुरू गुरनुले) 13 जुलै ला दुपारी ४ वाजता मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून अवघ्या तीन कीलोमीटर अंतरावर चंद्रपूर ला जाना-या एका कार वर रस्ता ओलांडताना सांबराने उडी मारली आणि तो सांबर कारच्या सामोरील काचेवर धडकला या अपघातात सांबर गंभीर जखमी झाला आणि कारचे पण भरपूर नुकसान झाले.
jangli sambar या घटनेची माहिती मिळताच fdcm चिचपल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस.बी.बोथे यांचे मार्गदर्शनात वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटना स्थळी जाऊन गंभीर जखमी सांबराला मूल येथे उपचारासाठी वाहनात आणताना त्याचा मृत्यू झाला.
महत्वाचे : सावित्रीबाई फुले आधार योजनेला मुदतवाढ द्या – सचिन राजूरकर
अपघातात मृत झालेले सांबर मादि असुन त्याचे वय जवळपास दोन वर्ष होते, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी मृत सांबराचे शवविच्छेदन केले व नंतर त्याचे दहण करण्यात आले.
jangli sambar या सर्व कार्यवाही दरम्यान fdcm चे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे, वनरक्षक यु.आर.गवई, प्रादेशिक चे वनरक्षक सूधिर ठाकुर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, प्रभाकर धोटे, दिनेश खेवले, विशाल टेकाम, संदिप सोयाम, आदित्य दहिवले उपस्थित होते.