junglee ran dukkar
सावली – तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु असून आज 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सावली कवठी गावाचे शाळकरी मुली शाळेत जात असतांना रान डुकराने त्या मुलीवर हल्ला केला, कसाबसा मुलींनी आपला जीव वाचविला, त्यांनतर त्या रान डुकराने शेतात जात शेतशिवारात काम करीत असलेल्या 3 शेतकऱ्यांवर हल्ला चढविला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर 5 जण जखमी झाले आहे.
junglee ran dukkar सावली विद्यालयात शिकणारे विद्यार्थिनी कु. तनु नायबनकर व 2 सहकारी विद्यार्थिनी हे सकाळी 10 वाजताच्या दरम्यान कवठीवरून निघाले असता तीन कवाडी जवळ जंगली डुकरांनी हल्ला चढवीला. त्यात अनुराधा गंभीर जखमी झाली व दोन सहकारी मुलींनाही दुखापत झाली. त्यानंतर तोच डुकर शेत परिसरातील शेतात काम करणारे आनंदराव चौधरी रा. सावली व सावली येथील अशोक आकुलवार त्यांचे घरामागे एका महिलेसह दोन इसमावर हल्ला चढवीला त्यात दोन गंभीर जखमी झाले होते त्यातील आनंदराव चौधरी हे मृत पावले.
गंभीर व्यक्ती सुरेश आकुलवार हे गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती असून तनु भास्कर नायबनकर, दुर्गा दहेलकर, केशवी लालाजी पाल या शाळकरी मुलींसह निर्मला आकुलवार, स्वप्नील आकुलवार यांचेवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
ही माहिती सावली नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार यांना कळताच रुग्णांना गडचिरोली दवाखान्यात जाऊन मदत केली. याबाबत सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे सह वन कर्मचारी व सावली पोलीस तपास करीत आहेत.