Ladki bahin yojana maharashtra वर्ष २०२४ – २५ अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या गाजवाज्याने घोषणा केलेली ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाचक अटी बघता असे लक्षात येईल कि, हि योजना केवळ गरजू गरीब लाभार्थ्यांना लाभापासून कसे वंचित ठेवता येईल यावर जास्त भर देण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया भूमिपूत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करा – खासदार धानोरकर
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा दिनांक १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ ठेवण्यात आली आहे. या १५ दिवसाच्या कालावधीत महिलेला अधिवास प्रमाणत्र आणि २.५० लाख पेक्षा कमी उत्पनाचा दाखला काढून या आणि इतर कागदपत्रांसह online अर्ज करणे अपेक्षित आहे. परंतू महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ या कायद्यामध्ये या दोन्ही प्रमाणपत्र १५ दिवसाच्या कालावधीत नागरिकांना पुरवणे बंधनकारक आहे.
महत्त्वाचे : क्षुल्लक वादात पतीने पत्नीवर केला प्राणघातक हल्ला, बाबूपेठ येथील घटना
Ladki bahin yojana maharashtra जर सरकाने स्वतः मान्य करत आहे कि हे प्रमाणपत्र काढण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागतो तर महिलांनी या कालावधीत प्रमाणपत्र काढायचे कधी आणि online अर्ज करायचा कधी?
महिला शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, दिनांक १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ या १५ दिवसाच्या कालावधीत अधिवास प्रमाणत्र आणि २.५० लाख पेक्षा कमी उत्पनाचा दाखला काढण्यासाठी लागणारे माहेरकडचे आणि सासरकडचे कागदपत्र आणि योजने साठी लागणारे इतर कागदपत्रांची जुळवा जुळवा करायची कशी हे समजण्या पलीकडचे आहे.
Ladki bahin yojana maharashtra समजा ही कागदांची जुडवा-जुडव करण्याची जादू एका शिक्षित महिलेने केली आणि यशस्वीपणे online अर्ज करण्याची लढाई जिंकली पण अशिक्षित महिलांचे काय? अशा कितीतरी शिक्षित आणि अशिक्षित महिला या योजने पासून वंचित राहतील.
सध्या अनेक सेतू केंद्रावर महिलांची मोठ्या संख्येत अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती, मात्र योजनेची वेबसाईट ओपन न झाल्याने महिलांना घरी परत जावे लागले.