Mahajyoti Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT- CET/JEE/NEET-2026 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
या योजनेबाबत पात्रता काय, अर्ज कसा भरायचा, अर्ज, नोंदणी झाल्यावर अर्जाचा लाभ कसा मिळणार, याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया.
अवश्य वाचा : ब्रिटिशकालीन कायदे इतिहासजमा
योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) :
➡️ उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
➡️उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी
➡️ उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
➡️जे विद्यार्थी सन 2024 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.
➡️ विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे. वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर
➡️ विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 आरक्षणानुसार करण्यात येईल.
➡️ इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकरीता 70% किंवा या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यकआहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
➡️ विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमूद पत्या वरून ठरविले जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ब):-
➡️10 वी ची गुणपत्रिका
➡️11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)
➡️आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
➡️रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट
➡️जातीचे प्रमाणपत्र
➡️वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
➡️दिव्यांग असल्यास दाखला
➡️अनाथ असल्यास दाखला
सामाजिक व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे
सामाजिक प्रवर्ग आणि टक्केवारी
➡️इतर मागास वर्गीय (OBC): 59%
➡️निरधीसूचित जमाती – अ (VJ-A): 10%
➡️भटक्या जमाती – ब (NT-B): 8%
➡️भटक्या जमाती – क (NT-C): 11%
➡️भटक्या जमाती – ड (NT-D):6%
➡️विशेष मागास वर्गीय (SBC):6%
एकुण: 100%
अर्ज कसा करावा:-
1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2026 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
3) अर्जासोबत’ ब’ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
website link:
https://mahajyoti.org.in/en/application-for-jee-neet-mht-cet-batch-2026-training-2/
Mahajyoti Yojana 2024 10 वी पास झालेल्या मुलामुलींना MHT-CET/JEE/NEET 2026 Training साठी फ्री टॅब दिले जाणार आहे. या साठी 10 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले गेले आहे. तर Free Tab Yojana अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे.
महत्त्वाचे : माझी लाडकी बहीण योजनेत बदल
नियम अटी व शर्ती (ड) :-
1) अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2024 आहे.
2) पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3) जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकार याबाबतचे सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा ज्योती यांचे राहतील.
4) अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ Mahajyoti Call Centre वर संपर्क करावा. संपर्क क्र. 0712-2870120/21 E mail ID: mahajyotijeeneet24@gmail.com
5) 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.
MHT-CET/JEE/NEET-2026 – पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी अर्ज
Mahajyoti Yojana 2024 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून MHT-CET/JEE/NEET-2026 परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET-2026 या परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्वतयारीसाठी OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी त्या वितरणाकरिता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सूचनाफलक मध्ये उपलब्ध “MHT-CET/JEE/NEET-2026 Traning” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलांवर माहिती उपलब्ध आहे.
टिपः टपालद्वारे / प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. महा ज्योती व्यवस्थापकीय संचालक च्या सूचनेनुसार.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर अंतर्गत दरवर्षी 10 वीच्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. Mahajyoti Scheme अंतर्गत विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना MHT-CET/JEE/NEET-2026 साठी फ्री मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी Free Tablet वाटप केले जातात. ज्याचा वापर करून आर्थिक मागास विद्यार्थी त्यांचे शिक्षणाचा वापर करून भविष्य सुधारू शकता.
ऑनलाइन अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी सखोल माहिती घेतल्यावर काळजीपूर्वक अर्ज भरावा, जेणेकरून या योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल.