Maharashtra Plastics and Thermocol Notification चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त मंगेश खवले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.
अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश…वाचा सविस्तर
प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले, सर्व व्यावसायिक,वितरक,हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.
New Indian Law : ब्रिटिशकालीन कायदे इतिहासजमा, चंद्रपूर पोलिसांची जनजागृती
Maharashtra Plastics and Thermocol Notification बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या की आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत आहे. प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
बैठकीस सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे,संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके, उपद्रव शोध पथक कर्मचारी उपस्थीत होते.