Mahila bachat gat गुरू गुरनुले मूल – महिलांचा आर्थिक विकास होऊन त्यांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संघटित होऊन बचत गटाची निर्मिती केलेल्या शेकडो महीला बचत गटांना विनातारण कर्जाच्या माध्यमातुन आर्थिक सहकार्य केल्याने आज हजारो महीला सक्षम व आत्मनिर्भर झाल्याचे दिसत असल्याने समाधान बँकेला व संचालक मंडळाला आहे असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
अवश्य वाचा : स्वच्छतेचे 2 रंग अभियानाला चंद्रपुरात सुरुवात
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल, राजोली आणि चिरोली शाखेच्या वतीने आयोजित महिला बचतगट मेळावा व गटाला कर्जवाटप करतांना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत बोलत होते. स्थानिक श्री माँ दुर्गा मंदिराचे सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यास बँकेचे ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार, क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, उपाध्यक्ष गुरुदास चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या पदाधिकारी पुष्पा कच्चेवार, वैशाली सावसाकडे, प्रणाली मल्लेवार, चंद्रकला सातपुते, आणि कुसुमबाई कोवे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.
Mahila bachat gat उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे यांनी प्राप्ताविक केले. यावेळी महिला बचत गटाच्या फरहाना शेख, मंदाताई चलावार, नलिनी आडपवार, जयमाला चंदनखेडे या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना बचत गटाला आर्थिक सहकार्य देऊन महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी दिली. याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार, क्रांतीज्योती पत संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या विविध कल्याणकारी योजना व कार्यावर प्रकाश टाकला.
मेळाव्यात बचत गटाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुल येथील गृहिणी महिला बचत गट आणि सावित्रीबाई महिला बचत गटाच्या पदाधिका-यांचा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व संचालक संदीप गड्डमवार यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षीय मनोगतनंतर बँकेच्या मूल शाखेतील ११ राजोली शाखेतील ७ आणि चिरोली शाखे अंतर्गत कार्यरत असलेल्या ७ अश्या एकूण २५ महिला बचत गटांना ८० लाखाचे वर कर्जाचे धनादेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय पडोळे यांनी तर विभागीय अधिकारी प्रशांत तोटावर यांनी आभार मानले.
Mahila bachat gat मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार यांचे मार्गदर्शनात मूल शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे, राजोली शाखा व्यवस्थापक नरेश पाडेवार, चिरोली शाखा व्यवस्थापक भास्कर पांचभाई, निरीक्षक नंदकिशोर मडावी, विनोद वेठे, अनिल सिरस्कर, तिन्ही शाखेचे निरीक्षक व कर्मचारी वृंद यांचे सह बँकेच्या बचत गटाच्या मार्गदर्शक महिला प्रतिनिधींनी माधुरी मांडवगडे,नलिनी आडपवार मुल सोनी शेंडे राजोली, नाजूका नागुलवार यांनी सहकार्य केले.