Main Bus Stand Chandrapur चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्टाप वर अनेक महिलांचे दाग,दागिने व पैसे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशन तसेच महिला काँग्रेस कडे प्राप्त झाल्या आहेत,परंतु बस स्थानकावर cctv नसल्यामुळे त्या चोरट्याना पकडणे शक्य नसल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्याकरिता बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात यावे या मागणीचे निवेदन शहर महिला कांग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिले आहे.
मागील महिन्यात सौ.अगडे यांचे 6 तोळे आणि श्रीमती डोरलीकर यांचे 10 तोळे, सोनं बस स्थानकावरून चोरीला गेले. याबाबतची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर मध्ये करण्यात आली, परंतु पोलीस विभागाकडून अजूनपर्यंत कुठलही समाधानकारक उत्तर मिळत नाही आहे, त्यामुळे संबंधित महिलांनी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ज्यांचे सोने चोरीला गेले त्या महिलांना सोबत घेऊन पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का तसेच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन दोन्ही महिलांचे सोने बस स्टॉप वरून चोरीला गेले असल्याने त्यांचेवर आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे,आपण याप्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची मागणी करणारे निवेदन खासदार धानोरकर तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले.
Main Bus Stand Chandrapur मागील अनेक वर्षांपासून मुख्य बस स्थानकाचे काम सुरू आहे, आता फक्त 10 टक्के काम शिल्लक आहे,मात्र अजूनही बस स्थानक व्यवस्थापकाने प्रवाश्यांची सुरक्षितता याबाबत विचार केला नाही, बस स्थानक हे नागरिकांच्या वर्दळीचे ठिकाण आहे, अश्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत चोर आपला डाव साधतात, हा प्रकार पोलीस व बस स्थानक व्यवस्थापक यांना माहीत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.
मात्र त्यानंतर सुद्धा अजूनही प्रशासनाने याबाबत काही ठोस पाऊले उचलली नाही, त्यामुळे आजही चोरीच्या घटना बस स्थानक परिसरात घडत आहे. विशेष म्हणजे अजूनही परिसरातील प्रतिष्ठाने अजूनही बस स्थानकातील इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे अजूनही बस स्थानक व्यवस्थापक प्रवाश्यांच्या सुरक्षितेतकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
चंद्रपुरातील शिवसैनिकांचे अधिकारी ऐकत नाही, 3 जिल्हाप्रमुख नियुक्त करात्यामुळे अजूनही गुन्हेगारी मुख्य बस स्थानक परिसरात फोफावत आहे, प्रशासनाने बस स्थानक परिसरात तात्काळ सीसीटीव्ही लावत चोरीच्या घटनांना आळा बसवावा अशी मागणी महिला कांग्रेस तर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.