Majhi ladki bahin yojana महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेची नुकतीच पावसाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. सदर योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी फक्त 15 दिवस असल्याने व त्या कालावधी आवश्यक कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने सदर योजनेच्या अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.
अवश्य वाचा : मुलाच्या खिशातून लायटर पडला, आणि पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला
महाराष्ट्र शासनाने आगामी विधानसभा निवडणूका डोळîासमोर ठेवून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सदर योजनेचा अर्ज भरण्याची दि. 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यत असून या करीता अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्या मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र व रहीवासी दाखल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठे व कसा कराल? जाणून घ्या
Majhi ladki bahin yojana या दोन शासकीय कागदपत्रांसाठी शासनाकडे किमान पंधरा दिवस लागतात. अशा वेळेस या योजनेचा लाभ कमीत कमी महीलांना मिळावा हा तर शासनाचा हेतू नाही ना? अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केली. त्यामुळे सदर योजना खरचं तळागळातील महिलांपर्यंत पोहचवायची असल्यास या योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी किमान 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.