Majhi ladki bahin yojana niyam राज्यात महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, मात्र सदर योजनेत महिलांना अर्ज करण्यासाठी केवळ 14 दिवसाची मुदत देण्यात आली होती, अनेक आमदार व मंत्र्यांनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार अशी घोषणा करीत अधिवास प्रमाणपत्राची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : 200 युनिट वीज मोफत, काय म्हणाले आमदार किशोर जोरगेवार
Majhi ladki bahin yojana niyam या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
शिवाय जमिनीबाबतची अट व अधिवास प्रमाणपत्राची अटही काढूण टाकण्यात आली आहे.
ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील.
अवश्य वाचा : त्या चोरांना आवरा, पालकमंत्री मुनगंटीवार यांना पोलीस अधीक्षकांना लिहावे लागले पत्र
योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
▪️महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार.
4) लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1) रेशन कार्ड
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.
4) उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते झेरॉक्स.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.