Mama Talav : मामा तलाव फुटला, चिंचपल्ली गावात पाणीचं पाणी

Mama talav चंद्रपूर पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चीचपल्ली गावात सकाळच्या सुमारास मामा तलाव फुटल्याने गावातील 300 घरात पाणी शिरले.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील पुरात दोघे गेले वाहून


Mama talav यामुळे गावातील 40 बकऱ्या दगावल्या, नागरिकांचे धान्य सुद्धा या पाण्यात वाहून गेले, सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी पवार त्याठिकाणी दाखल झाले असून गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले आहे.

मामा तलाव फुटला

Mama talav संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित मदत कार्य पोहचवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांनी केले आहे.


चंद्रपूर येथील चिचपल्ली गावाची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावे व त्यांना तात्काळ गरजू सेवा उपलब्ध करून द्यावे तसेच चिचपल्लीसह जिल्ह्यातील ज्या भागात नुकसान झाले आहेत. त्या ठिकाणचे पण त्वरित पंचनामे करून त्यांना मदत करावी असेही दिनेश चोखारे यांनी आवाहन केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!