mega job fair चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची संधी मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या संकल्पनेतून २८ जुलैला मुल येथील नवभारत विद्यालयाच्या पटांगणावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.भरपावसात युवक-युवतींची तोबा गर्दी होती.या मेळाव्यात आलेल्या हजारच्या संख्येने युवक युवतींना मुलाखती घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आले असून त्यांना आता रोजगार उपलब्ध झाले आहे.
अवश्य वाचा : पुन्हा पूर, चंद्रपुरातील हा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद
Mega job fair मुल येथे आयोजीत रोजगार मेळाव्यात देशातील ५० पेक्षा अधिक उद्योग,सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होते.दोन हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या गेले या मुलाखतीत पात्र उमेदवारांची निवड करून तत्काळ नियुक्ती पत्र दिले गेले.साधारण एक हजार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून अनेक दिवसांपासून बेरोजगारीच्या गर्तेत सापडलेल्या शिक्षीत व कुशल युवक युवतींनी शिवसेने कडून आयोजित मेळाव्याचे व जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांचे मनस्वी आभार मानले.
मेळाव्याला उपस्थित शिवसेना संपर्क प्रमुख तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत कदम,कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते,शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अँड.अनिल वैरागडे,गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली सिनेट सदस्य प्रा.दिलीप चौधरी, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डाहाके, सामाजिक कार्यकर्ते नथुजी पाटील आरेकर, मेळाव्याचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, उपजिल्हाप्रमुख सीक्की यादव, प्रा.शलिक फाले,महिला आघाडी जिल्हा संघटीका कल्पना गोरगाटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार,युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, तालुका प्रमुख प्रशांत गट्टवार,सुरज माडुरवार,राजू ठाकरे,राहुल भोयर, विनय धोबे,नगरसेवक सरफराज शेख,अमित पाझरे,प्रशांत मेश्राम, सागर राऊत, बबु पाठक,नगरसेवक बालाजी मेश्राम,आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : चंद्रपुरात युवकांचा जीवघेणा स्टंट, कार गेली पुरात वाहून
बल्लारपूर विधानसभेतील शिक्षीत व कुशल युवक युवतींनी शहर व खेड्या पाड्यातून येत मुल येथीलआयोजित रोजगार मेळाव्यात हजेरी लावली होती.भरपावसात सुद्धा मेळाव्यात आलेल्या युवक युवतींचा उत्साह कायम होता.यावेळी इंजिनिअरींग,आयटीआय,कृषी पदवीधर,एमबीए, पदवीधर,दहावी,बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. पुणे,नागपूर,मुंबई,गडचांदुर, चंद्रपू र,औरंगाबाद,येथील नामवंत कंपनीकडून मुलाकात घेऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी नियुक्ती पत्र मिळालेल्या युवकांनी आयोजकांचे आभार मानले व बेरोजगारांच्या पाठीशी शिवसेना उभी असल्याचा विश्वास यावेळी बोलून दाखवला.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुल येथील रोजगार मेळावा हि सुरूवात आहे.बेरोजगारांच्या हितासाठी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव तत्पर रहाणार आहे.यापुढेही यासारखे रोजगार मेळावे आयोजित केल्या जातील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी यावेळी बोलून दाखवला.
उमेदवारांना मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी केल्या गेले होते. क्यूआर कोडद्वारा उमेदवारानी नोंदणी फॉर्म भरला होता.रजिस्ट्रेशन लिंक वरून रोजगार मेळाव्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली होती.