mega job fair : राज्यात वाढत असलेली बेरोजगारी आता चिंतेचा विषय बनला आहे, 100 नोकरी जिथे असेल त्याठिकाणी लाखो बेरोजगारांचे अर्ज येतात, गुणवत्ता आणि पात्रता असून सुद्धा योग्य उमेदवाराला नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
अवश्य वाचा : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक, कारागृहात केले स्थानबद्ध
Mega job fair चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच अवस्था आहे, मात्र आता ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाती रोजगाराची मशाल देण्याचं काम शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे आपल्या माध्यमातून करीत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजतापासून नवभारत विद्यालय मूल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे आयोजित मेळाव्यात देशातील 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहे, शिक्षित व कुशल तरुण-तरुणींना या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
आयोजित मेळाव्यात 5 हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना थेट नियुक्ती पत्र सुद्धा दिल्या जाणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सदर रोजगार मेळाव्यातून युवाशक्तीचे हात सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
आयोजित रोजगार मेळाव्यात शिक्षित बेरोजगार युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संदीप गिर्हे यांनी केले आहे.