Mpda act सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र वाढत आहे, राज्यातील या लहान जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात जिल्ह्यातील विविध शहरात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, विशेष बाब म्हणजे 2 गुन्ह्यात गोळीबार करण्यासाठी बाहेर राज्यातून शूटर बोलाविण्यात आले होते. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढणे सुरू केले असून त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे.
Mpda act 29 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी चपराक देत त्याला 1 वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
दुर्गापूर समता नगर येथील 25 वर्षीय रोहित आदेश ईलमकर याच्यावर चंद्रपूर पोलिसात तब्बल 29 गुन्हे दाखल आहे.
त्यामध्ये घरफोडी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, लोकांना धमकावणे अश्या प्रकारचे 29 गुन्हे दाखल आहे.
समाजात वावरणाऱ्या या गुन्हेगारांची परिसरात दहशत असून याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते, पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधित कारवाई रोहित ईलमकर याच्यावर केली मात्र तो जुमानत नसल्याने MPDA अनव्ये प्रस्ताव तयार करीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या समक्ष सादर करण्यात आला, सदर प्रस्तावाची दखल घेत रोहित ईलमकर याला 25 जुलैला 1 वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, शिवलाल भगत, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक लता वाढीवे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश खरसान, अरुण खारकर, सुधीर मत्ते, मनोज रामटेके, परवरिष शेख, मंगेश शेंडे यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील अजूनही काही गँग ऍक्टिव्ह आहे, अंमली पदार्थाची तस्करी करणारे, त्यासोबत जिल्ह्यात वाळू तस्करी ने सुद्धा हैदोस घातला आहे, काही दिवसांपूर्वी चंद्रपूर-चीचपल्ली येथे हायवा चा अपघात झाला होता, त्या अपघातात वाहन चालक ठार झाला होता, रात्री च्या सुमारास या मार्गाचा संपूर्ण ताबा रेती तस्करांकडे जातो, रोज रात्री या मार्गावर अवैध वाळूची तस्करी होते, या गुन्ह्यावर सुद्धा पोलिसांनी लक्ष द्यायला हवे, कारण महसूल विभाग या प्रकाराकडे जाणून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे.
या तस्करीने सुद्धा गुन्हेगारीत भर पडताना दिसत आहे, वाळू तस्करीचे सर्वात जास्त प्रमाण सावली, मूल, पोम्भूर्णा या भागात जास्त आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची शोध मोहीम राबवून पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी.