Mukhyamantri ladki bahin yojana लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेत महिलांना दर महिन्याला 1 हजार ते 1500 रुपये मिळणार आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा महिलांना लाभ व महायुतीला किती फायदा होणार हा निवडणूक निकाल सांगेलचं..
अवश्य वाचा : मुले सांभाळत नसल्यास या नंबरवर करा कॉल
तोपर्यंत आपण या योजनेबाबत माहिती जाणून घेऊ, आजपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली मात्र अर्ज भरण्यास फक्त 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Mukhyamantri ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
त्यासाठी अर्ज करण्यास आजपासून प्रारंभ होणार आहे. सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल.
कोणत्या महिला असणार पात्र?
महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
अर्ज भरण्याची सुविधा
अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून
Mukhyamantri ladki bahin yojana‘’मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी (सोमवारी) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.