Negative News ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी कु. ईशा घनश्याम बिंजवे वय २४ हिने मंगळवार दिनांक 16 जुलै ला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान आपल्या एक्टिवा एम. एच. ४९ झेड ४१७६ ने वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर येऊन गाडीवर आपली चप्पल ठेवली आणि नदीच्या पुलावरून उडी घेतली.
नदीच्या पात्रात जास्त पाणी नसल्याने ती बचावली मात्र त्यानंतर त्या मुलीने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा डुबकी घेतली ती त्या प्रवाहात वाहून गेली. हि घटना 16 जुलैला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली, विशेष म्हणजे यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावरील लोकांची गर्दी उमडलेली होती, त्या गर्दीने बघ्याची भूमिका घेत तिला वाचविण्याऐवजी त्या मुलीचे व्हिडिओ बनवीत सोशल मीडिया वॉट्सप ग्रुप वर टाकले, या प्रकाराने व्हिडीओ बनविण्याची धडपड दाखविणाऱ्या नागरिकांची माणुसकी अगोदर मरण पावली.
negative news वैनगंगा नदी ही वडसा तहसीलच्या हद्दीत येत असल्यामुळे वडसा पोलीस पथक वैनगंगा नदीच्या पात्रात मुलीचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी नदीच्या पात्रा जवळ असणाऱ्या निलज गावाजवळ ईशा चा मृतदेह आढळून आला.ईशा ने MBBS ची पदवी घेतली होती, तिचे वडील डॉक्टर आहे. सध्या तरी आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.