obstructing traffic चंद्रपूर मनपाने यापूर्वी रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे यावर मालकांना आवर घालण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यानंतर सुद्धा जनावरे शहरात अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करताना दिसून येत असल्याने मनपाने पुन्हा कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असुन जनावरांना मोकाट सोडुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर सरळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
obstructing traffic शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले आहे.
महत्त्वाचे : आमच्या शाळेला शिक्षक द्या, विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद येथे आंदोलन
त्यामुळे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे.
रेल्वे विभागाने दाखवली तत्परता
मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा तर होतो मात्र त्यामुळे लहान मोठे अपघात सुद्धा होत असतात, ही एक गंभीर बाब असून जनावर मालकांनी सदर जनावरे गोठयात बांधून ठेवावे, 3 जुलै ला 4 मोकाट जनावरे मालगाडीच्या अपघातात ठार झाली होती, इतकेच नव्हे तर जनावरांचा मृतदेह रेल्वे इंजिनमध्ये फसल्याने मालगाडी तब्बल 1 तास आपल्या गंतव्याकडे जाण्यासाठी उशिरा पोहचली.
obstructing traffic त्यानंतर रेल्वे विभागाने रेल्वे रुळावर येणाऱ्या मोकाट जनावर मालकांवर ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्याच दिवशी दुपारी रेल्वे पोलिसांनी मोकाट जनावर मालकांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करीत अटक केली.
रेल्वे विभागाने कारवाई करण्यास जी तत्परता दाखवली तशी कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेने करायला हवी, अन्यथा जनावर मालक आपले जनावर असेच रस्त्यावर सोडून जातील, मनपाने आता थेट फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.