Petrol bomb attack चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात रविवारी 7 जुलैला भर दिवसा मालू वस्त्र भांडार येथे पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आला होता, 3 अज्ञात युवकांनी सदर दुकानात प्रवेश करीत दुकानात बसलेले अभिषेक मालू यांच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकला, प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी बंदूक काढत गोळीबार सुद्धा केला.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अम्मा ला व्हिडीओ कॉल
चंद्रपूर जिल्ह्यात लागोपाठ घडणाऱ्या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
बल्लारपूर शहरातील व्यापाऱ्यांनी सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेत व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे, भरदिवसा व्यापाऱ्यांवर असे हल्ले होत असेल तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
Petrol bomb attack मालू वस्त्र भांडार चे अभिषेक मालू यांनी आजपर्यंत झालेल्या हल्ल्याबाबत माहिती देत सरळ हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव घेतले.
महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे लक्ष द्या – खासदार प्रतिभा धानोरकर
आम्ही वारंवार याबाबत पोलीस विभागाला होत असलेल्या घटनेबाबत सूचना दिल्या मात्र ठोस कारवाई काही झाली नाही.
याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी मालू वस्त्र भांडार येथे गोळीबार झाला नाही अशी माहिती दिली, मात्र सदर दुकानात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने गोळीबार झाला असल्याची माहिती दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे, आजच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात चांगलीच दहशत पसरली आहे.
Petrol bomb attack 4 जुलै रोजी चंद्रपूर शहरात गोळीबार, 6 जुलै रोजी मूल तालुक्यातील हळदी गावात हत्या व 7 जुलै रोजी बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब हल्ला विशेष म्हणजे सर्व गुन्हे भरदिवसा घडले आहे.
बल्लारपूर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली एकजूट दाखवीत न्यायाची मागणी केली आहे, भरदिवसा असे हल्ले म्हणजेच त्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही.