Pik Vima : पीक विम्यावरून शिवसेना आक्रमक, कृषी विभागाला ताळे ठोकणार – संदीप गिर्हे, जिल्हाप्रमुख

Pik vima चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही त्याचाच संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात धडक दिली, अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम त्वरित जमा करा अन्यथा कृषी विभागाला ताळे ठोकू असा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे यांनी दिला आहे.

Pik vima मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा पीकविमा काढला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कुठे पिके करपून गेली मात्र इतकं मोठं नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळालेली नाही आहे.

अवश्य वाचा : शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्याला खासदार धानोरकर यांनी दिला दणका

जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. हीच समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारण्यात आला, तसेच कृषी विभागातील अधिकारी व इन्शुरन्स कंपनी यांचे साठ – लोट असल्याचा आरोप यावेळेस संदीप गीऱ्हे यांनी केला आहे. येत्या चार दिवसात शेतकऱ्यांचा पीकविमा मिळाला नाही तर कृषी विभागाला ताळे ठोकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

संदीप गिर्हे पुढे म्हणाले की जेव्हा सरकार या सर्व योजना सुरू करतात पण त्यामध्ये काय त्रुटी निर्माण होत आहे, कोण यामध्ये चुकत आहे, शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत आहे का? याबाबत साधी चौकशी सुद्धा करीत नाही, सरकारने या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. पीक विमा अर्ज करताना सुद्धा शेतकऱ्यांची लूट होते, आणि विम्याचे पैसे मिळविण्यासाठी त्यांना चांगलीच पायपीट करावी लागते हे आता कुठेतरी थांबायला हवे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!