Pik vima yojana शेतकरी हितासाठी काम करित असल्याचा दावा सरकारकडून सातत्याने केल्या जातो.पण प्रत्यक्षात मात्र स्थिती अतिशय गंभीर आहे.चंद्रपूर जिल्ह्यात 2023 या सत्रात अतिवृष्टी झाली होती.मात्र 55 हजार 775 शेतकरी अजूनही पंतप्रधान पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आता तातडीने त्यांना लाभ दयावा अशी मागणी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काॅग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
Pik vima yojana अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या परिस्थितीत शेतक-यांना नुकसानीची मदत मिळावी यासाठी पंतप्रधान पिकविमा योजना सुरू करण्यात आली.पण हि योजना पुरती फोल ठरते कि काय अशीच स्थिती दिसत आहे.या योजनेच्या माध्यमातून पिकविमा कंपन्या मालामाल होत आहेत. दुसरीकडे बळीराजाला मदतीकरिता वाटच वाट बघावी लागत आहे.
अवश्य वाचा : पिकविम्यावरून शिवसेना आक्रमक
Pik vima yojana 2023 च्या खरीप हंगामात चंद्रपूर जिल्यातील 3 लाख 50 हजार 976 शेतक-यांनी पिकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाईसाठी अर्ज केले होते.या हंगामात अवकाळी पाउस,पिकावर झालेले रोगाचे आक्रमण यामुळे कापूस,धान,व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते.दरम्यान या अर्जांपैकी केवळ 1 लाख,43 हजार 991 शेतक-यांना योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यांना १९१ कोटी ४९ लाख ८७ हजार रुपये योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत यापैकी ८८ हजार २१६ लाभार्थी शेतक-यांच्याच खात्यात विम्याचे पैसे आले आहेत. ८० कोटी १८ लाख ७८ हजार एवढी ही रक्कम आहे. उर्वरित ५५ हजार ७७५ शेतकरी १११ कोटी ३१ लाख ९ हजार रकमेच्या प्रतिक्षेत आहेत. योजनेत पात्र असूनही शेतकरी बांधवांना अजूनही मदतीची रक्कम मिळाली नसल्याने ते कमालीचे संतापले आहेत.शेतीचा हंगाम सुरू झाला आहे.अशावेळी नुकसान भरपाईची मत तातडीने देण्याची गरज आहे.अशी मागणी करित दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे निवेदन पाठविले आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष दयावे………
वेळेवर मदत न देणे,पात्र अधिकाधिक शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न करणे यासह अन्य मुद्द्यावरून पिकविमा कंपनांच्या धोरणाविरोधात आधीच शेतक-यांत संताप आहे.अशास्थितीत पात्र असून देखील चंद्रपूर जिल्हयातील ५५ हजार ७७५ शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.हि गंभीर बाब लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे लक्ष देउन तातडीने त्यांना मदत मिळऊन देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले.
तर आंदोलन करणार ……
शेतीचा हंगाम सुरू होउन बराच कालावधी झाला आहे. अशावेळी पैशाची नितांत गरज असतांना बळीराजाला मदतीपासून वंचित ठेऊन सरकार जखमेवर मिठ चोळण्याचे काम करित आहे.जर शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळाली नाही तर येत्या 22 जुलेै रोजी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिनेश दादापाटील चोखारे यांनी दिला आहे.