pilot नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यवसायिक पालटल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने http://chandaflying.govbharti.org या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत.
अवश्य वाचा : पुर आला आणि चंद्रपुरातील हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला
Pilot याबाबतची सविस्तर माहिती www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी यांना घेता येईल. तसेच याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकरीता अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.
चंद्रपुरातील युवकांनी वैमानिक क्षेत्रात अग्रक्रमाने पुढे जावे यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपुरात फ्लाईंग क्लब ची स्थापना केली, व अत्यल्प शुल्कात जिल्ह्यातील युवकांनी पायलट व्हावे असे नियोजन केले.