Plastic pollution चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर कारवाई करून ५०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे तसेच संबंधित दुकानदाराकडुन १५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रतिबंधित स्वरूपाचा मोठा प्लास्टिक साठा आढळल्याने दंड वसुल करण्यात आला असुन दुकानात पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पोलीस तक्रार करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
अवश्य वाचा : तुकडा बंदी कायदा, सकारात्मक निर्णय घ्या – हंसराज अहिर
प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई केली जात आहे.प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबविली जात आहे.
Plastic pollution दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात आहे.आतापर्यंत अनेकांनी मनपाच्या या योजनेचा लाभ घेतला आहे. बंदी असलेले प्लास्टिक कॅरी बॅगचा साठा, विक्री व वापर करणे तत्काळ बंद करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले असुन अन्यथा सक्त कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.