Poison detection system : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही यंत्रणा उपलब्ध नाही – आमदार जोरगेवार

Poison detection system विष प्राशन केलेल्या रुग्णाने नेमके कोणते विष प्राशन केले याची पडताळणी करणारी विषशोध यंत्रणा चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नाही. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागतो.

अवश्य वाचा : चंद्रपुरात 15 किलो खर्रा पन्नी जप्त

ही बाब लक्षात घेता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महविद्यालयात  विषशोध पडताळणी यंत्रणा (टॉक्सिकोलॉजी सेंटर) उपलब्ध कराअशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

 

   Poison detection system सदर मागणीवर उत्तर देताना विष शोध पडताळणी यंत्रणेच्या पडताळणी बाबत  समिती घोषित करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले की१४ कोटी लोकसंख्येच्या राज्यात केवळ मुंबईपुणेनागपूर आणि छ. संभाजीनगर या सहा शहरात टॉक्सिकोलॉजी सेंटर आहे.

महत्त्वाचे : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार

राज्यात हजारो विषबाधेची प्रकरणे येत असताना विषबाधेचा प्रकार शोधणारे सेंटर केवळ चार शहरात आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टॉक्सिकोलॉजी सेंटर सुरू करण्यात यावेअशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे. यावर उत्तर देताना याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले असून विषशोध पडताळणी यंत्रणेबाबत समिती घोषित करण्याची घोषणा केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!