Pratibha Dhanorkar : त्या आईच्या भावनिक हाकेला खासदार धानोरकरांची साद

Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नेहमी सामाजिक कार्यासाठी चर्चेत असतात. अशाच एका विद्यार्थ्याच्या पालकांनी मोबाईल वरुन खासदार प्रतिभा धानोरकर यांना संपर्क साधला. वडील नसलेल्या या विद्यार्थ्याच्या आईचे वॉट्सअॅप वरील निवेदन बघून खासदार प्रतिभा धानोरकर भारावून गेल्या व लगेच त्यांनी त्या मुलाचे संपूर्ण शुल्क भरुन शिक्षणासाठी मदतीचा हात दिला.

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

Pratibha dhanorkar अलीकडे अनेक राजकारणी स्वतः चा स्वार्थ बघत असतांना स्वतः च्या लोकसभा क्षेत्राबाहेरील उस्मानाबाद येथील एका विद्यार्थ्याच्या आईचे निवेदन वॉट्सअॅपवर प्राप्त झाले. त्यांनी सदर निवेदनात खासदार धानोरकरांना भावनीक साद घालत विद्यार्थ्याच्या वडिलाचे निधन झाले असून मुलगा सैनिकी शाळा बल्लारपूर येथे 10वी शिकत असल्याचे सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरु शकत नसल्याचे खंत व्यक्त केली. शैक्षणिक शुल्क न भरल्यास वर्ष वाया जाण्याची भिती व्यक्त केली. सदर निवेदनाची दखल घेत सामाजिक भान राखत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सैनिकी शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क करुन संपूर्ण शुल्क स्वतः भरणार असल्याचे सांगितले व आज  दि. 18 जुलै रोजी आपल्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून शाळेची संपुर्ण शुल्क कुठलेही राजकीय स्वार्थ न ठेवता लोकसभा क्षेत्रा बाहेरच्या एका आईची भावनिक हाक म्हणून भरले. या प्रसंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही व्याख्या सार्थ ठरविली. उस्मानाबाद येथील त्या विद्यार्थ्याच्या आईने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार व्यक्त करीत लवकरच चंद्रपूर येथे येऊन भेट घेणार असल्याचे सांगितले.

अवश्य वाचा : ती मृत्यूशी लढत होती आणि नागरिक तिचा व्हिडीओ काढत होते, धक्कादायक घटना

Pratibha dhanorkarआजच्या व्यस्त कार्यात जनप्रतिनिधी यांना मोबाईल बघण्यासही वेळ नसतो, आमदार नंतर प्रतिभा धानोरकर ह्या खासदार बनल्या, त्यामुळे कामाचा व्याप वाढला, दररोज त्यांच्या मोबाईल वर हजारो कॉल येतात, त्यामधून सुद्धा खासदार धानोरकर यांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या संदेशाचे वाचन केले आणि त्या काही काळ स्तब्ध राहिल्या.

मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं व पत्नीच्या आयुष्यातून पतीचे अचानक जाणे हे त्या संदेशातून व्यक्त झाले होते, ती परिस्थिती व अनुभव खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाट्याला आला होता, मात्र त्या प्रसंगातून जाणाऱ्या आईचं दुःख खासदार धानोरकर यांना समजलं, त्यांनी त्या आईसोबत याबाबत चर्चा करीत पूर्ण माहिती घेतली. संपूर्ण माहितीची खातरजमा केल्यावर त्यांनी आपल्या स्वीय सहायकाला निर्देश दिले व त्या आईच्या भावनिक हाकेला त्यांनी साद दिली.

खासदार धानोरकर यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा आता लोकसभा क्षेत्रात होत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!