Pratibha Dhanorkar : पूरग्रस्त चीचपल्ली येथे खासदार धानोरकर यांचा महत्वपूर्ण उपक्रम

Pratibha dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल चिचपल्ली येथे झालेल्या पुरपरिस्थीतीचा आढावा घेत महसूल अधिकाऱ्याशी चर्चा करीत आज नुकसानग्रस्त नागरीकांच्या कुटूंबियांना जीवनापयोगी वस्तूंची किट देऊन ‘‘मदत छोटीशी, मी सदैव पाठीशी’’ हा उपक्रम कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मदतीने राबविला.

Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामूळे काल चिचपल्ली येथील मामा तलाव फुटून अनेक नागरीकांच्या घरात पाणी गेले. त्यासोबतच पिंपळखुट गावाला देखील पुराने वेढले होते. या घटनेची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या शी चर्चा करुन पुरग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करण्याची विनंती केली होती. त्यासोबतच उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन नुकसानग्रस्त नागरीकांची माहिती घेतली.

चंद्रपुरात वाढदिवसानिमित्त सुरू झाली वृक्षारोपणाची मोहीम

आजपासून लोकसभेचे अधिवेशन सुरु असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘‘मदत छोटीशी, मी सदैव पाठीशी’’ हा संदेश नागरीकांना देत जिवनापयोगी वस्तूंचे वाटप केले. यावेळी 200 कुटूंबीयांना मदतीचा हात देत मी सदैवा पाठीशी राहणार असल्याचा संदेश पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहचविला. या उपरोक्त देखील मी मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

अवश्य वाचा : सैनिक स्कुल चंद्रपूरचा तो प्रश्न निकाली लागणार

यावेळी उपक्रमासाठी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, कॉग्रेस नेते सुधाकर अंबोरे, माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेर रजा, डॉ. गावतूरे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, कॉग्रेस नेते मधुभाऊ मेश्राम, सौरभ ठोंबरे यासह गावकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!