Pratibha dhanorkar speech : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

Pratibha dhanorkar speech लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जुलै पासून सुरुवात झाली असून लोकसभेत पहिल्यांदाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून बहूमतांनी निवडून गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ला जाब विचारुन आपल्या पहिल्या भाषणाला सुरुवात केली.

अवश्य वाचा :शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

Pratibha dhanorkar speech वरोरा विधानसभेच्या आमदार पदाच्या काळात विविध आयुधांचा वापर करुन मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत शून्य तासात शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. खासदार धानोरकर म्हणाल्या कि, 2014 मध्ये उत्पन्न दुप्पट करुन देण्याचे वचन मोदी सरकार ने दिले. पण हे सरकार संपुर्ण अपयशी ठरले असून शेतकरी कुटूंबांची परिस्थिती भयावह असल्याचे देखील मत यावेळी व्यक्त केले.

बघा संपूर्ण भाषण

मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हîात 444 तर यवतमाळ जिल्हîात 1641 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हîातील 444 शेतकऱ्यांपैकी 122 तर यवतमाळ जिल्हîातील 1641 पैकी 819 शेतकरी अपात्र ठरल्याचे आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हे सरकार पोकळ घोषणा करणारे असून फक्त आपल्या उद्योग मित्रांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांप्रती असणारी उदासिनता दुर करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात केली. 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!