rajura shootout : 2 देशी कट्टे आणि चाकू, असा घडला राजुरा गोळीबार

rajura shootout राजुरा : चंद्रपूर जिल्ह्या गुन्हेगारीचा हब बनू पाहतो आहे, जुलै महिन्यातच 3 मोठ्या घटना घडल्याने आता गुन्हेगार कधीही काही करू शकतो अशी दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार गोळीबार असो की मालू वस्त्र भांडार पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार आणि आता राजुरा शहरात जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकावर गोळीबार व चाकू हल्ला करण्यात आला, यामध्ये त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

अवश्य वाचा : राजुरा शहरात गोळीबार, युवकाचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

Rajura shootout 23 जुलै 2024 ला सायंकाळी शिवज्योत हरदेवसिंग देवल हा आईची प्रकृती बरी नसल्याने तिला दवाखान्यात नेऊन घरी परत येत असताना पंचायत समिती जवळील व्यापार संकुलात 2 अज्ञात इसमानी शिवज्योत वर हल्ला केला, आधी चाकूने हल्ला करीत ते दोघे शिवज्योत चा पाठलाग करू लागले, जीव मुठीत घेऊन शिवज्योत पळाला, त्याने आधी ओम जनरल स्टोर्स चा आधार घेतला मात्र त्या इसमानी तिथे त्याला गाठले, शिवज्योत दुकानाच्या मागील बाजूस पळाला पण आरोपीनी त्याच्यावर तिथे गोळीबार केला, एक गोळी शिवज्योत च्या डोक्याला लागली, त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे राजुरा सहित चंद्रपूर जिल्हा हादरून गेला, पोलीस घटनास्थळी दाखल झाली, घटनेचे गांभीर्य व सतत होणाऱ्या गोळीबार यामुळे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे राजुरा शहरात पोहचले.

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी लगेच तपास सुरू केला, पथक तयार करीत आरोपीच्या मागावर लावले, आणि 3 तासांनी तालुक्यातील साखरवाही येथे 2 आरोपीना अटक केली, आरोपी कडून 2 कट्टे व 1 चाकू पोलिसांनी जप्त केला, आरोपीमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायी 30 वर्षीय बलदेवसिंग उर्फ लल्ली राजेंद्रसिंग शेरगिल व 18 वर्षीय शगिर कदिर शेख राहणार सोमनाथपुरा याला अटक करण्यात आली.

घटनेचे कारण काय?

23 जुलै 2023 ला राजुरा शहरातील सोमनाथ पुरा येथे रात्री 8 वाजे दरम्यान 2 अज्ञात इसमानी लल्ली शेरगिल वर गोळीबार केला होता, त्या गोळीबारात लल्लीच्या पाठीला गोळी लागली आणि तो बचावला मात्र 28 वर्षीय पूर्वशा डोहे यांचा त्या गोळीबार घटनेत काही दोष नसताना मृत्यू झाला होता. या गोळीबारातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने 2 तासात अटक केली होती. लबज्योत सिंग देवल व अल्पवयीन मुलगा या दोघांनी मिळून लल्ली वर गोळ्या झाडल्या, जाताना लबज्योत म्हणाला होता ज्यादिवशी बाहेर येईल त्यादिवशी तू गेला म्हणून समज अशी धमकी दिली.

अवश्य वाचा : चंद्रपूर– मूल मार्गावर भीषण अपघात

वर्ष लोटलं आणि लल्ली ची धाकधूक वाढली 2 वर्षापूर्वी लल्ली ने लबज्योत च्या भावाला मारहाण केली म्हणून गोळीबार झाला, तो बाहेर आल्यास आपला गेम करणार यासाठी आपण काहीतरी करायला हवं असा मनात बेत निर्माण करीत लल्ली एक योजना आखली व आपल्या गुन्ह्यात दुसऱ्याचा सहभाग नोंदविला आणि गोळीबाराची वर्षपूर्ती साजरी करीत त्याने लबज्योत चा मोठा भाऊ शिवज्योत वर गोळीबार करीत त्याला ठार केले.

लल्ली चे टार्गेट लबज्योत होता मग शिवज्योत चा बळी का घेतला हे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे, चंद्रपूर जिल्ह्यात सतत घडणाऱ्या गोळीबार घटनेत पोलीस बेसावध आहे, आता तरी पोलीस प्रशासनाने धरपकड मोहीम राबवित रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी करायला हवी. 24 जुलै ला गुन्ह्याचं गांभीर्य बघता नागपूर परिक्षेत्र महानिरीक्षक भुजबळ पाटील राजुरा शहरात दाखल झाले आहे, अश्या घटना आता पुन्हा घडायला नको असे निर्देश त्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले असल्याचे समजते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!