School student एकीकडे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च होत आहे पण शालेय विद्यार्थ्यांना मात्र बस सुविधे अभावी शाळेपासून वंचित रहावे लागणे ही गंभीर समस्या सध्या उभी राहत आहे.
महत्त्वाचे : चंद्रपुरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त
शाळा व महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या भरपूर असल्याने काही विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे, तर उर्वरित विद्यार्थ्यांना बस मध्ये घेतल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून मुकावे लागत आहे.
School student तसेच ज्या बसेस सुरू आहेत त्यांच्या वेळा अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा तास व वर्ग सोडून बस पकडण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे वायगाव,निंबाळा व मामला परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या परिसरात बसेसच्या वेळा वाढवीत त्यांची वेळ शालेय विद्यार्थ्यांना सोयीची होईल या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यासह डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम 2 महिन्यात पूर्ण करा – आमदार किशोर जोरगेवार
बस एकच आणि विद्यार्थी आणि प्रवासी जास्ती त्यामुळे एका बसमध्ये सारे प्रवासी बसू शकत नाही, कित्येक जणांना बसमध्ये घेतल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते बसेसच्या वेळा व शाळा सुटण्याच्या वेळेत फरक असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा शेवटच्या तासाला मुकावे लागते आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरवर परिणाम होत आहे, करोडो रुपये खर्च करून बस स्टेशन व इतर सुशोभीकरणाच्या,देखाव्याच्या वस्तू, बांधणारे सरकार व पालकमंत्री यांना विद्यार्थ्यांचे हे दुःख समजत नाही काय? असा प्रश्न यावेळी डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी उपस्थित केला.
ही मागणी येत्या दोन दिवसात मंजूर न झाल्यास विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशारा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या समस्याचा पाढा वाचून आपला रोष व्यक्त केला.