Shikshan Prasarak mandal गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकीत शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या निवडणुकीत अॅड. अनिल वैरागडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवृत्त मुख्याध्यापक शशिकांत धर्माधिकारी यांनी अजय वासाडे यांचा चार मतांनी पराभव करीत विजय मिळविला. दरम्यान, कार्याध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला नसल्याने हे पद सध्या रिक्त आहे.
Shikshan Prasarak mandal शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्ष पदासाठी अॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष पदाकरिता अॅड. प्रणव वैरागडे आणि अजय वासाडे, सहसचिव पदाकरीता प्राचार्य ते. क. कापगते यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल न केल्याने ही सर्व पदे अविरोध निर्वाचित झाली होती. कार्यकारी सदस्य म्हणून यशवंत पुल्लकवार, वैशाली वासाडे यांचीही अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदासाठी शशिकांत धर्माधिकारी व अजय वासाडे यांचे दोन उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली.
डॉक्टर मुलीची आत्महत्या, लोक बनले मुकदर्शक१४ पैकी १२ सदस्यांनी मतदान केले, यामध्ये शशिकांत धर्माधिकारी यांना ८ तर अजय वासाडे यांना ४ मते मिळाली. दरम्यान, मागील २६ वर्षांपासून शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर या निवडणुकीने कायमचा पडदा पडला आहे. संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात शैक्षणिक विकास आता जोमाने करण्यात येईल, असा विश्वास नवनिवर्वाचित अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे यांनी व्यक्त केला.
शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने मूल व सावली तालुक्यात विविध विद्यालय, महाविद्यालये व छात्रालये चालविली जातात. या संस्थेत १९९८ पासून अंतर्गत वाद होते. हे वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम निर्णय देत, २००२ ते २००७ ची कार्यकारिणी वैध ठरवित सहा महिन्याच्या आत सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी नवीन कार्यकारीणीसाठी निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. या आदेशानुसार बुधवारी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल येथे निवडणूक घेण्यात आली. अखेर मूलच्या पदाधिकाऱ्यांनी उभी केलेली संस्था २६ वर्षानंतर मूलच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आल्याने मुल नागरिकात आनंद व्यक्त केल्या जात आहे.