Shiv Sena District Chief Girhe : शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची माणुसकी, 2 चिमुकल्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Shiv Sena District Chief Girhe मूल :- मुल तालुक्यातील हळदी येथे दि.६ जुलै शनिवार ला घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या शुल्लक वादात कुऱ्हाडीने राजेश बोधलकर यांची हत्या करण्यात आली.कुटुंबातील कर्ता व्यक्तीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले होते.या घटनेची माहिती मिळताच सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी मृतकाच्या कुटुंबीयाची सांत्वना करीत मृतकाच्या दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत यापुढे मी आपल्या कुटुंबा सोबत राहणार असल्याची ग्वाही संदिप गिऱ्हे यांनी यावेळी दिली.

अवश्य वाचा : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार, मुनगंटीवार यांचा पुढाकार

Shiv Sena District Chief Girhe मुल तालुक्यातील हळदी येथे दोन दिवसा अगोदर ह्रदयद्रावक घटना घडली.घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या शुल्लक वादात कुऱ्हाडीने पस्तीस वर्षीय राजेश बोधलकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली.राजेश बोधलकर हा गावात अत्यंत शांत,संयमी व गावकऱ्यांशी मनमिळाऊपणे राहत होता.कुटुंबातील कर्ता व्यक्तीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले होते.याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना मिळाली.गिऱ्हे यांनी मृतकाच्या कुटुंबीयाची भेट घेत सांत्वना केले.

शिक्षणाची जबाबदारी

सामाजिक जबाबदारी म्हणून मृतकाच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.व यापुढेही मी आपल्या कुटुंबा सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार शहर प्रमुख आकाश राम,विनोद चलाख,ऋतिक मेश्राम,क्षितिज शेडमाके,लोमेश गावतुरे,वामन चलाख व आदी गावकरी उपस्थित होते.

महत्त्वाचे : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

दुःख बघून गिर्हे गहिवरले

संदिप गिऱ्हे यांच्या सांत्वना भेटीत मृतकाच्या कुटुंबीयाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.कर्ता पुरुष गेल्याच्या दुःखाने पत्नी व मुलांनी एकच हंबरडा फोडला.यावेळी गिऱ्हे यांचेही डोळे पाणावले.यावेळी संदिप गिऱ्हे यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबीयांच्या पाठीशी मी सदैव तत्पर राहिन अशी ग्वाही दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!