Shivsena Shinde चंद्रपुर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे चंद्रपुर व बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील उद्योगात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात संबंधित कंपनी व प्रशासनाला वारंवार निवेदनाद्वारे मागणी करुन देखील अधिकाऱ्यांकडून उड़वाउडवीचे उत्तर देत असल्याने विदर्भातील विधान परिषदेचे नवनियुक्त शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी हस्तक्षेप करुन सदर विषय निकाली काढण्यास सहकार्य करुन उबाठा प्रमाणे दोन विधानसभेकरीता एक असे तीन जिल्हा प्रमुख नियुक्ति करण्याबद्दल पक्षश्रेष्ठीच्या निदर्शात आणून देण्यासंदर्भातील चर्चा चंद्रपुर व बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार कृपालजी तुमाने यांच्या नागपुर येथील निवासस्थानी घेतलेल्या भेटी दरम्यान करण्यात आली.
यावेळी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात वाहतुक जिल्हाध्यक्ष तथा वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनल आत्राम, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद बूटले, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख दिपक कामतवार, नगरसेवक नानाभाऊ दुर्गे यांनी विदर्भातील विधान परिषदेचे नवनियुक्त शिवसेना आमदार कृपालजी तुमाने यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करुन दोन्ही विधानसभा क्षेत्रातील समस्याबद्दल चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक समस्या सोडवीत असताना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, वारंवार त्यांना शिवसेना पदाधिकारी निवेदने देतात, त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाही, म्हणून उबाठा प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात 3 जिल्हाप्रमुख हवे अशी मागणी तालुकाप्रमुख पारखी यांनी केली आहे.
Shivsena Shinde त्याचप्रमाणे चंद्रपुर व बल्लारपुर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष संघटना वाढीस फक्त आणि फक्त मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान होवून मागील दोन वर्षापासून सतत करित असलेल्या लोकहिताच्या निर्णयामुळे पक्ष जोमाने वाढत असून आजपर्यंत चंद्रपुरात शिवसेना जिल्हा कार्यालय नसताना देखील चंद्रपुर व बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य, शासकीय कार्यालयातील व इतर कामे सर्व तालुका प्रमुख, शहर प्रमुख व पदाधिकारी निस्वार्थपणे शिवसेना पक्षाचे काम करीत असल्यामुळे विदर्भातील विधान परिषदेचे नवनियुक्त शिवसेना आमदार या नाते मा. आ. कृपालजी तुमाने यांनी सदर विषय पक्षश्रेष्ठी यांच्या निदर्शात आणून देवून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची विनंती करण्यात आली.
नुकतेच उद्धव ठाकरे शिवसेना गटाने चंद्रपूर जिल्ह्यात 3 जिल्हाप्रमुख यांची नियुक्ती केली आहे, त्याचप्रमाणे शिंदे गटाने सुद्धा तशीच मागणी केली आहे, आता पक्षप्रमुख यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.