Shootout at chandrapur : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, 3 वर्षांपूर्वीच्या गोळीबाराची पुनरावृत्ती

Shootout at chandrapur चंद्रपुरात भर दुपारी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांने रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार केला. यामध्ये अमन अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली आहे, त्यांना उपचारासाठी पोलिसांनी नागपूर येथे रेफर केले आहे.

Chandrapur Railway Police : एका चुकीने ट्रेन 1 तास उशिरा, चंद्रपुरात रेल्वे पोलिसांची दोघांवर कारवाई

4 जुलै रोजी गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दोघांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर गोळी झाडली, सदर गोळी अन्देवार यांच्या पाठीला लागली, अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.

 

Shootout at chandrapur 8 ऑगस्ट 2020 मध्ये अवैध दारु व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर शहरात सूरज बहुरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, पोलिसांनी त्या प्रकरणात अमन अन्देवार व आकाश अन्देवार याला अटक केली होती.

तर सेतू केंद्र रद्द करणार, लाडकी बहीण योजनेवरून देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

वर्ष 2021 मध्ये आकाश अन्देवार याची जामिनावर सुटका झाली होती, त्यानंतर 12 जुलै 2021 मध्ये आकाश अन्देवार यांच्यावर रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये बहुरिया समर्थकांनी गोळीबार केला. आकाश ला त्यावेळी 3 गोळ्या लागल्या तो सुदैवाने तो बचावला होता मात्र त्यानंतर पुन्हा असा हल्ला अन्देवार बंधूंवर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

 

Shootout at chandrapur आज 4 जुलै ला दुपारी अमन अन्देवार हे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील मनसे जनसंपर्क कार्यालयात येत होते, कार्यालयात जाण्यासाठी अंदेवार लिफ्ट जवळ आले, ते मोबाईल वर बोलत असताना अचानक 2 युवक रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये आले त्याठिकाणी एक युवक हा वाहनाजवळ थांबला होता तर दुसरा युवक बॅग घेऊन अंदेवार यांच्या मागून आला त्याने बंदूक काढत अन्देवार यांच्यावर गोळी झाडली. गोळी अंदेवार यांच्या पाठीला लागली, अंदेवार तिथून पळाले व हातात दांडू घेत पुन्हा जखमी अवस्थेत बाहेर येत मारेकऱ्याच्या मागावर गेले तोपर्यंत मारेकरी तिथून पळाला होता.

 

सदर प्राणघातक हल्ला हा जुन्या वादातून झाला की नव्या कोणत्या वादातून याबाबत पोलीस तपास करीत आहे, जर हा हल्ला जुन्या वादातून झाला असेल तर भविष्यात पुन्हा अशा घटना नक्की घडणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!