shootout राजुरा – 23 जुलैला सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर असलेल्या महाराष्ट्र बॅकेच्या एटीएम जवळ शिवजीतसिंग देवल या युवकावर मोटरसायकलने आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी झाडताच हा युवक तेथील ओम जनरल स्टोअर्स मधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला. मात्र हल्लेखोर दोन्ही युवक त्या युवकाचे मागे धावत गेले आणि तेथे जवळून दोन गोळ्या झाडल्या. यात शिवजीतसिंग देवल, वय 28 युवक जागीच ठार झाला.
अर्थसंकल्प प्रतिक्रिया – विकासाचा रोड मॅप
गोळीबारा मृतक युवक ट्रक चालक असल्याचे कळते. या घटनेतील मृतक हा मागील वर्षी झालेल्या गोळीबारातील आरोपीचा मोठा भाऊ असल्याचे समजते.
माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रेत राजुरा उपजिल्हा रूग्णालयात हलविले. घटना घडताच पोलिस बंदोबस्त चोख करण्यात आला असून पोलिसांनी युध्दपातळीवर आरोपींचा शोध सुरू केला आहे. सदर गोळीबार हा पूर्व वैमनस्यातून झाला अशी माहिती समोर आली आहे.
याच दिवशी झाला होता गोळीबार
मागील वर्षी 23 जुलै 2023 ला राजुरा येथे लल्ली शेरगिल याच्या मागावर काही इसम लागले होते, त्यांच्यापासून वाचण्यासाठी शहरातील सोमनाथपुर वार्डातील भाजयुमो उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी लपण्यासाठी लल्ली शेरगिल आला मात्र मारेकऱ्यांनी गोळीबार केला असता एक गोळी लल्ली च्या पाठीला लागली होती, नेमकं त्याचवेळी सचिन डोहे यांच्या पत्नी पुढे आल्याने त्यांच्या छातीवर गोळी लागली, या हल्ल्यात पूर्वशा सचिन डोहे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Shootout या प्रकरणात 19 वर्षीय लवज्योतसिंह देवल व अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती, जखमी लल्ली ने त्यावेळी 2 वर्षांपूर्वी आरोपी लवज्योतसिंह याच्या भावाला ला मारहाण केली होती, त्याचा राग मनात ठेवत लल्ली शेरगिल वर गोळीबार करण्यात आला होता, मात्र त्या हल्ल्यात निष्पाप पूर्वशा डोहे यांचा मृत्यू झाला.
चंद्रपूर बनतंय गँग ऑफ वासेपुर, एका महिन्यात 3 गोळीबाराच्या घटना
4 जुलैला चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी व्यापारी संकुलात मनसे कामगार सेना अध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, आरोपीने मागून अंदेवार यांच्यावर गोळी झाडली, गोळी पाठीला लागल्याने अंदेवार बचावले होते, पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपीना अटक केली मात्र गोळीबार करणारा आरोपी अजूनही पसार आहे.
7 जुलैला बल्लारपूर शहरातील गांधी चौक येथील मालू वस्त्र भांडार येथे 3 आरोपीनी पेट्रोल बॉम्ब टाकत गोळीबार केला होता, या प्रकरणात पोलिसांना नुकतेच यश प्राप्त झाले असून 1 आरोपीला अटक करण्यात आली आहे, 23 जुलैला राजुरा शहरात गोळीबार झाला व त्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.
चंद्रपूर पोलीस दलातील गुप्तचर यंत्रणा ढेपाळल्या की काय असे चित्र सतत होणाऱ्या गोळीबार सत्राने निर्माण झाले आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पोलीस निरीक्षकावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत बदली करण्याचे निर्देश दिले आहे.