Speed limit sign चंद्रपूर -नागपूर रोड महामार्गावर हाय- टेक फार्मसी, मामीडवार सोशल वर्क, प्रशासकीय सेवा महाविद्यालय अशे विविध महाविद्यालय असून हजारोंच्या वर विद्यार्थी -पालक -शिक्षक या मार्गाने येजा करीत असतात परंतु या मार्गावर विविध महाविद्यालयाच्या वळणावर जड वाहतूक करणार्या मोठंमोठ्या ट्रक गाड्या नेहमी रस्त्यावर उभ्या केल्या जातात परिणामी विद्यार्थ्यांना समोरील वाहतूक बघण्याकरीता व जाणे येणे करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे.
या महाविद्यालयाच्या जवळ सुरक्षा हेतू वेग मर्यादा निर्देश, इतर सुचना देणारे फलक सुद्धा नसल्याने भविष्यात मोठ्या अपघाताला सुद्धा समोरे जावे लागू शकते या विषयाला घेऊन विद्यार्थ्यांनी युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रा निलेश बेलखेडे यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा करून निवेदन दिले यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय(RTO) चंद्रपूर येथे भेट देऊन यासंदर्भात युवासेना काॅलेज कक्षाच्या वतीने निवेदन दिले.
अवश्य वाचा : पीक विम्यावरून शिवसेना आक्रमक
Speed limit sign यावेळी विद्यार्थी- शिक्षकांच्या वाहतूक सुरक्षा हेतूने विविध विषयांवर आरटीओ अधिकारी मेश्राम साहेब तसेच कदम साहेब यांच्या शी चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन लवकरच या ठिकाणी भेट देऊन दिशादर्शक बोर्ड लाव़़ण्यात येईल व जड वाहतूक उभ्या राहील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार तसेच विविध महाविद्यालयात भेटी घेऊन रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वासन कार्यालय अधिकारी यांच्या वतीने देण्यात आले.
महत्त्वाचे : अखेर त्या शाळेला मिळाले शिक्षक
यावेळी विद्यार्थांच्या या शिष्टमंडळामध्ये युवासेना काॅलेज कक्षाचे आदर्श लडस्कर यांच्या सह हिमांशु तपासे, प्रिय मोहिते, अयान खान, सुचित कुर्जेकर, तनिष्क गनपुरकर, प्रथमेश रायपुरे, शशांक बिसेन यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा समावेश होता.