Student news गुरू गुरनुले मुल – चालू शैक्षणिक सुरुवात होताच मुल येथील शाळा महाविद्यालय सुरु झाले. तालुक्याच्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा असल्याने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, नवभारत विद्यालय मुल, कर्मवीर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मुल येथे विरई येथील जवळपास ३५ ते ४९ विद्यार्थी विद्यार्थिनी नियमित परिवहन महामंडळाच्या बसने जाणे येणे सुरु होते. विद्यार्थिनी पासेसही काढल्या होत्या. असे असताना मागील अनेक दिवसापासून नियमित येणारी एस. टी.बस काहीही अचानक बंद झाली. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत होते.
महत्त्वाचे : कांग्रेस नेते मेंढे यांनी झोपडपट्टी वासीयांमध्ये ताडपत्री चे केले वाटप
या संदर्भात वीरई येथील १० विद्यार्थिनी ही अडचण कांग्रेस नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना सांगितली असता रावत यांनी याची गंभीर दखल घेत मुल बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक व जिल्हा आगार व्यवस्थापक यांचेकडे संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मुल तालुका काँग्रेसच्या वतीने तात्काळ बस सुरु करावी असे लेखी निवेदन दिले. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तेथील सरपंच, सदस्य,ग्रामस्थ यांचेही सहकार्य घेतले. असता परिवहन महामंडळ जागे झाले. आणि विद्यार्थ्यांची ही समस्या गंभीर असल्याने दिनांक १७/७/२०२४ पासून विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले. व विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
Student news विद्यार्थ्यांच्या हितासाठी संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसचे जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, कांग्रेस पदाधिकारी राजू पाटील मारकवार, माजी सरपंच अनिल निकेसर,प्रदीप कामडे, वीरई सरपंच सौ.गेडामताई व इतर सदस्य यांचेही सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांची समस्या संतोष सिंह रावत यांचे पुढाकाराने पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी, पालकांनी व ग्रामस्थांनी श्री.रावत यांचे जाहीर आभार मानले आहे.