Sudhir Mungantiwar : शहरातील बंगाली कॅम्प येथे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राचे उदघाटन

Sudhir mungantiwar चंद्रपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणे आणि नियमित मासिक उत्पन्न देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशातून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे या उद्देशातून भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून गरजुंना आधार देण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील एका घरात शिरले 3 बिबट आणि घडलं असं


Sudhir mungantiwar भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील या केंद्राचे उद्घाटन १७ जुलैला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, मनोज पाल, मंगेश गुलवाडे, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, भारती दुधानी, छबू वैरागडे, रुद्रनारायण तिवारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु, शासकीय योजनांची माहिती अनेकांना नसते. बरेचदा माहिती असूनही त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, हे कळत नाही. त्यामुळे मनोज पाल यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले सेवा केंद्र गरजुंच्या पाठिशी उभे राहण्याचे काम करणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मनोज पाल यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या हस्ते केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत निःशुल्क सेवा दिली जाणार आहे. याचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मनोज पाल यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!