Sudhir Mungantiwar : कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मुनगंटीवार झाले भावुक

sudhir mungantiwar आज वाढदिवसाच्या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळत आहे. लोकांचे प्रेम मिळत आहे. या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील बालाजी मंदिरात आयोजित महाआरती प्रसंगी ते बोलत होते.

महत्त्वाचे : गडचांदूर बॉम्ब प्रकरणी जुळे भाऊ ताब्यात

Sudhir mungantiwar ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भगवान बालाजीची आपल्या परिवारावर कृपा आहे. महाराष्ट्रात कोणालाही मिळाला नसेल असा बहुमान भगवान बालाजीने आपल्या परिवाराला दिला आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने माझ्या अर्धांगिनीची नियुक्ती तिरूपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी केली होती . यातून भगवान बालाजीची सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. केवळ मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्याच्या हितासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. जनसेवेचे व्रत आपण घेतले आहे. हे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

अवश्य वाचा : लोकसभा पावसाळी अधिवेशनात प्रतिभा धानोरकर यांचे जोरदार भाषण

ना. श्री. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बल्लारपूर,दुर्गापूर, लखमापूर येथे महाआरती करण्यात आली. मूल येथे रूग्‍णांना फळे व भेटवस्‍तुंचे वाटप करण्यात आले. कार्यकर्ता स्‍नेहमिलन घेण्यात आले. पुरग्रस्‍त भागातील नागरिकांना अन्‍नधान्‍याच्‍या किटचे वाटप करण्‍यात आले. पोंभूर्णा येथे विविध आजारांवर मोफत उपचार करण्‍यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्‍यात आले. राजुरा येथेही महाआरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. काशीनाथ सोमा टेकाम यांचा पुरात बुडाल्याचे मृत्यू झाला. यांच्‍या पत्‍नी सिंधुबाई टेकाम व मुलगा सुनिल टेकाम यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते चार लाख रूपयांचा सानुग्रह निधी प्रदान करण्‍यात आला. चंद्रपूर महानगर भाजपा तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. जिल्हाभर कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. वाढदिवसाच्या दिवशीही जनसेवेशी संबंधित उपक्रम राबवित ना. श्री. मुनगंटीवार यांनी लोकनेता कसा असतो, याचा परिचय पुन्हा एकदा दिला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!